प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देण्याच्या हेतूने स्टार प्रवाह वाहिनी उदयास आली आणि बघता बघता १० वर्ष झाली. मनोरंजनाचा हा प्रवाह गेली १० वर्ष अखंडपणे सुरु आहे तो प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच. रसिक प्रेक्षकांचं निर्व्याज प्रेम हाच या प्रवाहाचा श्वास. या दहा वर्षात प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि घरातल्या कुटुंबाचा सदस्य वाटणारी पात्र स्टार प्रवाह या वाहिनीने दिली. त्या पात्रांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं आणि त्यामुळेच दहा वर्षांचा हा टप्पा गाठणं शक्य झालं.

संगीताला परिभाषा देणाऱ्या आणि अनेक होतकरू संगीतकार व गायक यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला इतकं प्रेम दिलं की दुसऱ्या पर्वानंतर आता संगीत सम्राट महासंग्राम हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. कार्यक्रमाची रूपरेषा ही सारखीच असून याकार्यक्रमात पर्व १ आणि पर्व २ मधील टॉप ६ स्पर्धकांमध्ये सुरांची मैफिल प्रत्येक आठवड्याला रंगते.

स्टार प्रवाहवरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत अत्यंत भावनिक वळण येऊ घातलंय. नेहा आणि प्रतापमधल्या गैरसमजांचं मळभ दूर होत असतानाच आता नेहाला परीच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे.

भाऊजी म्हंटलं कि डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पैठणीचा खेळ आणि भाऊजींचं औक्षण करणाऱ्या वाहिनी. भाऊजींनी त्यांच्या मिश्किल स्वभावाने या पैठणीच्या खेळात इतकी रंगत आणली कि ही कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आणि गेली १४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेला पैठणीचा खेळ अजूनही तितकाच रंजक आहे. पण आता हेच भाऊजी आता एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आम्ही दोघी मालिकेत नुकतंच शरद पोंक्षेची एंट्री झाली आणि मालिकेला एक रंजक वळण मिळालं. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि देवाशिष, मीरा आणि दुर्वा दिवाळी साजरी करण्यासाठी मामाच्या घरी राहायला आले आहेत.

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

Advertisement