कोणत्याही रियॅलिटी शोचा पहिला दिवस आणि अंतिम फेरी हा प्रवास सर्वांसाठी वेगळाच असतो. पहिल्या दिवशी शो विषयी उत्सुकता असते तर अंतिम फेरीत कोण जिंकेल याविषयी कुतुहल असतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात असंच कुतूहल निर्माण झालंय की कोण होणार ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’. १५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला रंगणार आहे. इतके महिने स्पर्धकांमध्ये तयार झालेली चुरस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि आता या स्पर्धेत ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चे टायटल कोण जिंकणार याकडेच सर्वांचे लक्ष.

ख्रिसमस जवळ आला की आपोआपच सेलिब्रेशनचे बेत आखले जातात. ख्रिसमस ट्री सजवण्यापासून ते अगदी सरप्राईज गिफ्ट पर्यंत सगळ्याच गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण एन्जॉय करतात. ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा आईने असंच एक खास सरप्राईज तिच्या लाडक्या परीला दिलं.

धम्माल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको. सरत्या वर्षाला हसरा निरोप देण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी सज्ज आहे. स्टार प्रवाहवरील ‘येरे येरे १९’ या विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची खुसखुशीत मेजवानी मिळणार आहे. तुमच्या लाडक्या कलाकारांचा आजवर न पाहिलेला अंदाज या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणता येईल.

प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पाडला जात नाही, जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्विकारणे म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला जास्त मोल न देता प्रेमाला महत्त्व देणे महत्त्वाचे असते आणि हे सिध्द केलंय सोनी मराठीवरील प्रेमळ जोडी ‘अपूर्वा आणि विजय’ यांनी. मेमरी कार्ड रिकव्हरीच्या निमित्ताने अपूर्वाचं विजयच्या मल्टीपर्पज दुकानात येणं हे विधिलिखितच होतं. कारण अचानकपणे झालेल्या भेटीचं भविष्यात काहीतरी वेगळंच प्लॅनिग तयार झालेलं असतं. अनेक अडचणींना धैर्याने सामोरे गेल्यावर ‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिकेत अपूर्वा आणि विजयच्या आयुष्यात आनंदी प्रसंग घडणार आहे.

लग्न... दोन जीवांबरोबरच दोन कुटुंबांचं मिलन. या सोहळ्यादरम्यान होणाऱ्या छोट्या-छोट्या गोड गोष्टींनी हा सोहळा परिपूर्ण होतो. पूर्वी लग्नाची तारीख ठरली की बस्ता बांधणीची तयारी सुरू केली जायची. इथे वधू-वरांच्या कपड्यांपासून मानपानाच्या साड्यांचा ओढा वधूपित्याला ओढावा लागायचा. मात्र गेल्या काही वर्षात या प्रथेत बदल झाला आहे. लग्नसोहळ्याची मजा लुटण्याच्या हेतूने दोन्ही कुटूंब एकत्र येतात आणि लग्नाआधीच्या खरेदीचा आनंद लुटतात. अरेंज असो वा लव्ह, लग्न करून एक होणाऱ्या वधू-वरांना एकमेकांना भेटण्याची ही एक नामी संधी. त्यात दोन कुटूंब एकत्र येऊन नवरा-नवरीला चिडवण्यात येणारा आनंद काही औरच. तेव्हा या प्रथेला सहसा कुणी नाही म्हणताना दिसत नाही.

मुलांचा आवडता नातळ सण आता जवळ आला आहे आणि आपल्या सगळ्यांचा आवडता सांता क्लॉज दरवर्षीप्रमाणे खूप आनंद घेऊन येणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा व्यक्ती असतो जो आपला सांता क्लॉज बनून आनंद घेऊन येतो, आपलं आयुष्य सुंदर बनवतो. पण क्रिसमसला आपण या सांता क्लॉजची विशेष करून वाट बघतो, कि तो येईल आणि आपल्याला छानस सरप्राईझ गिफ्ट मिळेल.

Advertisement