स्टार प्रवाहने आजवर आपल्या मालिकांतून वेगवेगळी कथानकं सादर केली आहेत. उत्तम कलाकार, दर्जेदार निर्मितीमूल्यं आणि नवा आशय मांडणारी गोष्ट हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ‘छत्रीवाली’... नाव जितकं हटके आहे तितकीच हटके आहेत यातली पात्रसुद्धा.

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या कार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळाले. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत गेली आणि परीक्षकांनी तावून सुलाखून महाराष्ट्राला ५ उत्तम डान्सर्स दिले. ओम डान्स ग्रुप, चेतन साळूंखे, वाय ३ डान्सहॉलीक्स, सद्दाम शेख आणि गॅंग १३ हे ५ स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी भिडणार आहेत.

झी युवावरील लोकप्रिय मालिका गुलमोहर मधील हृदयस्पर्शी कथांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. सध्या गुलमोहर मालिकेच्या काही भागात 'बोक्या सातबंडे' या ९०च्या दशकातील मस्तीखोर पण तितक्याच लाघवी व्यक्तिरेखेच्या मनोरंजक कथा सादर केल्या जाणार आहेत. आगामी कथेत बोक्या हा त्याच्या समोरच्या घरात राहणाऱ्या बेलवंडी आजी - आजोबांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणार आहे.

कलर्स मराठीवरील नुकतीच सुरु झालेली लक्ष्मी सदैव मंगलम् ही मालिका सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. विशेषकरून प्रेक्षकांना प्रत्येक भागामध्ये दिसणारे गावाचे सौंदर्य आणि मालिकेमधील कलाकार. गावामध्ये वाढलेली अवखळ, लाघवी, प्रेमळ अशी लक्ष्मी म्हणजे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या मालिकेमध्ये मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहेत यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता मालिकेमध्ये लक्ष्मीच्या लग्नाचा विवाहसोहळा रंगणार आहे.

विनोद, आजच्या काळाचा एक परवलीचा शब्द. हा विनोद आपल्याला अनेक पातळय़ांवर भेटत असतो. झी मराठी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या दर्जेदार कार्यक्रमामधून सकस विनोद जगभरातील मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आज अनेक वर्ष या कार्यक्रमाचा ताजेपणा कायम आहे. या कार्यक्रमात सादर होणारी विविध विनोदी स्कीट्स व त्यात सहभागी होणा-या निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे या कलारांनी या कार्यक्रमाचा दर्जा कायम ठेवलेला दिसतो. त्यासाठी हे विनोदवीर करत असलेली मेहनतही त्यात दिसून येते.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल देखील रंगला “मिशने ए कुशन” हा टास्क या टास्क मध्ये सई विजयी ठरली. बिग बॉस यांनी दिलेल्या शेवटच्या ऑर्डर मध्ये सईच्या टीमने बाजी मारली. नंदकिशोर यांना रेशमने सईच्या टीमच्या सगळ्या ऊशा चांगल्या आहेत हे सांगणे पटले नाही आणि ते त्यांनी रेशमला काल बोलून देखील दाखवले. काल पुष्कर, मेघा, शर्मिष्ठा, सई यांचे नंदकिशोर बरोबर चांगलेच भांडण झाले, ज्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वातावरण काही वेळासाठी जरा तापलेलेच होते. परंतु, नंदकिशोर यांना त्या भांडणावरून इतके नक्कीच कळून चुकले कि, पुष्कर, सई, मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा हे पाच जण एकमेकांना धरून आहेत आणि त्यांच्यामध्ये आता चांगली मैत्री आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सई आणि त्यागराज मध्ये रंगणार आहे कॅप्टनसीचा टास्क. कोण बाजी मारणार ? कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ? हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठीमध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Advertisement