'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील 'लागिरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे ही मालिका हे यश आणि टीआरपीचे उच्चांक गाठू शकली. शीतली आणि अज्याची प्रेमकथा प्रेक्षकांनाही भावात आहे तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे. शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमाला अनेकांचा विरोध होता पण तो विरोध न जुमानता त्यांच्या प्रेमावरील दृढ विश्वासामुळे ते दोघे लवकरच एकत्र येणार आहेत. लग्नाची बोलणी झाल्यानंतर अजिंक्य आणि शीतलच्या लग्नाचा मुहूर्त ३० मे चा निघाला आहे.

आपण देवावर किती प्रेम करतो या पेक्षा देव आपल्यावर किती प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे आजकालच्या चुकीच्या रूढी परंपरांचा बागुलबुवा न करता काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी देवाला सुद्धा मनुष्यरूपात मानवाला त्याचा एक मित्र म्हणून भेटण्याची गरज निर्माण होत आहे, हे दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झी युवा वाहिनीने देवाशप्पथ या मालिकेतून केला आहे. क्रिश म्हणजे कृष्ण हा देव त्याच्या श्लोक या भक्ताला भेटायला पृथ्वीतलावर आला आहे. पण हा श्लोक मात्र देवाला मानतच नाही आणि त्या दोघांची जुगलबंदी प्रेक्षक मालिकेत अनुभवतात. नुकतंच मालिकेत श्लोक आणि कुहू लग्नाच्या बेडीत अडकले.

टीआरपीचे उच्चांक गाठलेल्या झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवाती पासूनच पसंती दर्शवली. राधिका, गॅरी, शनाया आणि मालिकेतील इतर पात्रं देखील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी मालिकेत राधिका आणि गुरुनाथ यांचा जुना मित्र सौमित्रची झालेली एंट्री देखील रंजक होती. या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांनी अखंड पाठिंबा दिला.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रेशम आणि मेघामध्ये सदस्यांनी बहुमताने रेशमला सुरक्षित करण्यात आले तर मेघाला घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी नॉमिनेट करण्यात आले. मेघाचा काल वाढदिवस होता, याच दिवशी तिला घरातील सदस्यांनी घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले. मेघाने काल पुष्कर जवळ मनात दडलेल्या खूप गोष्टी बोलून दाखवल्या. रेशम आणि माझ्यामध्ये जर ठरवायचे झाले तर मीच सुरक्षित होण अपेक्षित होते असे मत तिने व्यक्त करून तिची नाराजगी व्यक्त केली. पुष्कर, सई, आऊ सगळ्यांवरच ती खूप चिडलेली होती असे दिसून आले. परंतु सई मात्र मेघाला वाचविण्यासाठी तिच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले जे आस्तादने देखील मान्य केले. सई सुध्दा नॉमिनेट झाल्याने पुष्कर आणि मेघाशी बोलत नसल्याचे दिसून आले.

Colors Marathi's Bigg Boss Marathi Season 1 is becoming very popular in a very short time due to the many twists and turns. The nomination process and eviction process happens every week to eliminate 1 contestant from the Bigg Boss House. In 3rd Week, Rajesh was voted out by the audience, but Bigg Boss has his own powers, by which he was sent to secret room. He though could not use this immunity and was eliminated by public votes in 5th Week.

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये राधा आणि प्रेम यांच्या मध्ये सगळेच सुरळीत चालू होते. राधाने प्रेमचा व्यवसाय चालविण्यास मदत करणे, त्याच्यासोबत ऑफिसला जाणे, राधाचा प्रेमला पुरेपूर आधार मिळत होता. प्रेमने राधाच्या पाठिंब्याने त्याच्या आयुष्यातले खूप मोठे सत्य देखील पचवले होते कि तो माधुरीचा मुलगा नसून त्याला दत्तक घेतले होते. राधाने खूप आव्हांनाना पार करत मोठ्या जिद्दीने स्वत:चा संसार सांभाळला होता. प्रेमच्या मनामध्ये देखील तिने स्वत:ची हक्काची अशी जागा राधाने बनवली होती. परंतु हे सगळे मात्र दिपीकाची आई देवयानी हिला रुचले नव्हते. तिने राधा आणि प्रेमच्या विरोधात खूप मोठे कारस्थान रचले आणि त्यामध्ये ती यशस्वी देखील झाली.

Advertisement