स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेत विक्रमच्या साखरपुड्याचं धमाकेदार सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. विक्रमचा साखरपुडा नक्की मधुराशी होणार की नीलमशी याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. आईच्या अंतिम इच्छेखातर विक्रम नीलमशी लग्न करायला तयार झालाय. पण मधुरावर त्याचं जीवापाड प्रेम आहे. विक्रम आणि मधुराच्या प्रेमकहाणीचा खरंच अंत होणार का? याचं उत्तर छत्रीवालीच्या पुढील भागांमध्ये मिळणार आहे.

झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी मराठी तारका हा कार्यक्रम सादर करणार आहे. महेश टिळेकर यांनी गेल्या ११ वर्षांपासून मराठी अभिनेत्रींना एकत्र आणून त्यांचा सहभाग असलेल्या 'मराठी तारका' या गीत-संगीत-नृत्याच्या कार्यक्रमाने तमाम मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी अभिनेत्रींना ग्लॅमर मिळवून देणारा हा कार्यक्रम विदेश आणि भारतभरात मिळून ५०० हून अधिक शोज झाले आहेत. नुकताच हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये “ठाकरे” या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रसिध्द होत आहे. याचनिमित्ताने या चित्रपटाची टीम म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्रकार, राज्यसभा संसद सदस्य संजय राऊत कार्यक्रमामध्ये आले आहेत. मकरंद अनासपुरे यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं या दोघांनी एकदम बेधडक तर काही उत्तरं एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली. तेंव्हा बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाचा धमाकेदार भाग येत्या शुक्रवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

सैनिकाच्या जीवनावर आधारित असलेल्या लागिरं झालं जी या मालिकेत एक स्तुत्य उपक्रम राबवला जाणार आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहीद परिवाराचा सन्मान व सांत्वन सोहळा पहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राची लावणीची परंपरा जिवंत ठेवत, युवा पिढीला या पूर्वापार चालत आलेल्या लोकप्रिय नृत्याची ओळख करून देण्यासाठी झी युवा वाहिनीने 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणला. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध लोकनृत्य 'लावणी'ला मंच उपलब्ध करून देणाऱ्या अप्सरा आली या कार्यक्रमात बुधवार ते शुक्रवार प्रेक्षक महाराष्ट्रातील लावण्यवतींची अदाकारी अनुभत आहेत. या कार्यक्रमात फक्त महाराष्ट्रच नव्हे तर चक्क परदेशातूनदेखील लावण्यवतींनी सहभाग घेतला आहे.

छत्रीवाली मालिकेत विक्रम आणि मधुराचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचलंय. मधुरा आणि विक्रमच्या लग्नाची बोलणी सुरु असतानाच या दोघांच्या नात्यात नीलमची एण्ट्री झाली. विक्रमचं मधुरावर जीवापाड प्रेम असलं तरी विक्रमचं लग्न नीलमशी व्हावं ही विक्रमच्या आईची अंतिम इच्छा होती. त्यामुळे विक्रमचा साखरपुडा नक्की नीलमशी होणार की मधुराशी याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

Advertisement