कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याचश्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. प्रेम बऱ्याच दिवसांपासून खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये होता कि, दीपिकाच्या पोटात वाढणार मुलं हे त्याचं आहे. पंरतु त्याचा हा गैरसमज राधाने दूर केला आणि प्रेमला सांगितले कि, दीपिका ताई प्रेमला फसवत असून ते बाळ प्रेमचं नसून आदित्यच आहे. हे सत्य ऐकून प्रेमला आदित्यचा प्रचंड राग येतो.

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील वातावरण आता सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे. सकाळची सुरुवात शांततेच होणार असून ऋतुजा आणि पुष्करचा एक धम्माल डांस प्रेक्षकांन बघायला मिळणार आहे. ऋतुजाची एक वेगळी बाजू, कला आज प्रेक्षकांना दिसणार आहे. पुष्कर तर उत्तम डांसर आहेच पण या डांस मध्ये ऋतुजा त्याला डांस शिकवताना दिसणार आहे.

घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. दादासाहेब आणि त्यांच्या मुलगा सूर्या ही दोन्ही पात्रं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. दादासाहेबांच्या मुलाचे पात्रं साकारणे आणि त्यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे असे सुयश टिळक म्हणतात. ऑनस्क्रिन अँग्री यंग मॅन असलेला सुयश मालिकेत नुकतंच गीताच्या प्रेमात पडला आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील विनीत भोंडे हा बराच वेळा चर्चेचा विषय असतो. मग त्याचे जोरजोरात बोलणे असो वा त्याचे चिडणे असो. बिग बॉसच्या घरामध्ये नियमांना खूप महत्व असते. घरातील कुठलाही रहिवाशी बिग बॉसने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही आणि असे केल्यास त्याला शिक्षा देण्यात येते. असेच काहीसे विनीत भोंडे बद्दल झाल्याचे दिसून येते.

दोन मालिका एकत्र आणून त्यांचा महासंगम करण्याची स्टार प्रवाहची संकल्पना प्रेक्षकांना प्रचंड आवडली. 'शतदा प्रेम करावे' आणि 'नकळत सारे घडले' या दोन मालिकांच्या महासंगमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता 'गोठ' आणि 'छोटी मालकीण' या लोकप्रिय मालिकांचा महासंगम येत्या शुक्रवारी, २७ एप्रिलला पहायला मिळणार आहे. 'गोठ' आणि 'छोटी मालकीण' या दोन मालिकांच्या कथानकातला ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवेल.

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या रहिवाश्यांची आजच्या दिवसाची सुरुवात “सावधान सावधान वणवा पेट घेत आहे” या गाण्यावर होणार आहे. काल बिग बॉसने दिलेल्या “खुर्ची सम्राट" या खेळावरून घरामध्ये बरीच भांडण झाली. रहिवाश्यांमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळाले. टीम रेशम विरुध्द टीम आस्ताद असे जरी खेळाचे दोन गट असले तरीदेखील टीम रेशम मधील स्पर्धकांनी आस्तादला वगळता बाकी सगळ्यांवर आपली नाराजगी, राग व्यक्त केला. काल या सगळ्यांचीच वेगळी रूपं प्रेक्षकांच्यासमोर आली असे म्हणायला हरकत नाही.

Advertisement