प्रेम आणि लग्न हा विषय चित्रपटांसाठी नेहमीच एव्हरग्रीन असतो. या विषयाचे नवनवे कंगोरे चित्रपटांतून बघायला मिळतात. 'टीटीएमएम - तुझं तू माझं मी' या चित्रपटातून प्रेम आणि लग्न या विषयावर हलक्याफुलक्या पद्धतीनं भाष्य करण्यात आलं आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट स्टार प्रवाहवर १ जुलैला रविवारी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरद्वारे पहायला मिळणार आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “होऊ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य रंगले. काल सई आणि शर्मिष्ठाचे फोटो लपविण्यावरून झालेले भांडण चांगलेच रंगले. तसेच आस्तादने देखील नळाच्या टास्कदरम्यान भूषण कडूला टेंगुळ आले होते ही गोष्ट एक वेगळ्या प्रकारे ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रेक्षकांसमोर सादर केली. तसेच सईने काल डोळ्यावर पट्टी बांधून ऑमलेट बनवले. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेकिंग न्यूज बिग बॉस मराठीतील सदस्य बिग बॉस न्यूज मध्ये सादर करत आहेत. आजदेखील रंगणार काल “होऊ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य. सदस्य हा सगळा खटाटोप करत आहेत कॅप्टनसीची उमेदवारी मिळविण्यासाठी. “होऊ दे चर्चा” या साप्ताहिक कार्यामध्ये आजसुध्दा बऱ्याच ब्रेकिंग न्यूज बघायला मिळणार आहेत. तसेच आस्तादने कुठल्या गोष्टीचा ? आणि का निषेध केला ? हे आणि आजच्या ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Zee Yuva's Sangeet Samrat Season 2 is finally on air and is already received immense support by the viewers. The show has undergone a revamp and has adapted a completely new avatar. The show has welcomed talents from all over Maharashtra to come and display their musical skills on stage. One of the major changes in this year's show format is the introduction of Captains. The captains, Savaniee, Juilee, Abhijeet and Rahul will mentor the contestants who will help them groom all through the competition. Unveiling the third episodes, the audition process is finally closed. The judges have selected 50 contestants for the captains.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले दोन टास्क. बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना जरा हटके असे “होऊ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य सोपवले. ज्यामध्ये आस्ताद मंगळावर पोहचला तर पुष्करने बिकिनी घातली. आऊ आणि शर्मिष्ठाने मोठे भांडण झाल्याचे दाखवले. यानुसार मेघा आणि रेशमने पुष्कर आणि आस्तादला सगळ्यात जास्त सनसनाटी आणि ब्रेकिंग न्यूज दिले असल्याचे सांगितले. त्यांनतर पुष्कर रिपोर्टर आणि आस्ताद कॅमेरापर्सन बनला. आज कोण बाजी मारणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम हंक म्हणून गश्मीर महाजनीचं नाव घेतलं जातं. आपल्या अभिनयानं मोठा पडदा व्यापल्यानंतर आता गश्मीर स्टार प्रवाहच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर एक अनोखा शो घेऊन येतोय. गश्मीरचं छोट्या पडद्यावरचं हे पदार्पण नक्कीच दिमाखदार असणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात अश्या पद्धतीने कोणत्याही कलाकाराचं पदार्पण आजवर झालेलं नाही.

कलर्स मराठीवरील कुंकू, टिकली आणि टॅटूमालिकेमध्ये वटपौर्णिमा साजरी होणार आहे. कुंकू, टिकली आणि टॅटू मालिकेमध्ये विभा, सुभद्रा, कामिनी यांच्यासोबत रमाची बहीण देखील येणार वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी सहभागी होणार आहे. परंतु रमा तिथे पूजा करण्यासाठी आली नाही हे बघून तिला आश्चर्य वाटणार आहे. सात जन्म हाच नवरा मिळो म्हणून पत्नी ही पूजा करते. वडाच्या झाडाला दोऱ्याचे वेष्टन देऊन दिवसभर उपवास व्रत आचरून सती – सावित्रीचे हे व्रत मोठ्या भक्तीभावाने पार पाडले जाते. मालिकेमध्ये सुभद्रा, विभा, कामिनी छान नटून, साड्या नेसून वटपौर्णिमाची पूजा करण्यास जाणार आहेत. परंतु रमाने मात्र हे व्रत ठेवण्यास नकार दिला आहे. आता रमाचा यावर का नकार का आहे ? विभाचे यावर काय म्हणणे असणार आहे. हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. तेंव्हा बघायला विसरू नका कुंकू, टिकली आणि टॅटू मालिकेमध्य वटपौर्णिमा विशेष फक्त कलर्स मराठीवर.

Advertisement