कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' या कार्यक्रमातील छोटे सुरवीर आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. कार्यक्रमामधील सगळ्याच लहान मुलांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या सुंदर गाण्याने वेड लावले आहे. कार्यक्रमामधील हे छोटे सुरवीर विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करत आहेत. कार्यक्रमामधील स्पर्धकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या भागामध्ये देखील असेच काहीसे घडले.

आयुष्यात चढ उतार हे येतंच असतात. त्याला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. मात्र, उतारा नंतरच्या चढाला बघून जो खचत नाही तोच खरा विजेता ठरतो. मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकरच्या यशाचे गमक देखील यातच दडलेल आहे.

लावणी म्हंटलं कि डोळ्यासमोर येते ती म्हणजे अदाकारा व लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची कला. लावणी या लोकनृत्याची परंपरा जिवंत ठेवण्यात तसेच नवीन पिढीला या परंपरेची ओळख करून देण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. सुरेखा पुणेकर यांनी वयाच्या ८व्या वर्षांपासून लावणी आत्मसात केली आणि तेव्हा पासूनच लावणी आणि सुरेखा पुणेकर हे दोन समानार्थी शब्द झाले.

‘स्टार प्रवाह’वरील ‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा आणि विक्रमच्या नात्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळतायत. मधुरावर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रमने बऱ्याचदा आपल्या प्रेमाची कबुली दिलीय. मधुराला वेगवेगळी सरप्राईजेसही दिली आहेत. एवढंच नाही तर त्याने आपला जीव धोक्यात घालून मधुराला मनवण्याचा प्रयत्न केलाय. मधुराचं प्रेम जिंकण्यासाठी विक्रम वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यासाठी त्याने आणखी एक शक्कल शोधून काढलीय.

आतापर्यंत सोनी मराठी वरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर अनेक कलाकारांनी स्पर्धकांचे सुपर परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी हजेरी लावली आहे. पण या मंचावर नुकतीच एक आश्चर्यकारक घटना अशी घडली की, बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने हक्काने सुपर एण्ट्री करुन ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या सेटवर सर्वांना सरप्राईज केले. ‘आला रे आला सिंबा आला’ असा आवाज ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर घुमला कारण या मंचावर सिंबाने सरप्राईज एण्ट्री करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले होते.

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये कवी मनाचा महानेता रामदास आठवले आणि महाराष्ट्राचा लाडका गायक आनंद शिंदे यांच्यासोबत मकरंद अनासपुरे यांनी दिलखुलास संवाद साधला आहे. काही प्रश्नांची उत्तरं एकदम बेधडक तर काही उत्तरं एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली. या गप्पा चांगल्याच रंगल्या... रामदास आठवले यांनी आनंद शिंदे यांच्या काही गाण्यांचा अर्थ देखील गंमतीदार पद्धतीने सांगितला आहे. तर आनंद शिंदे यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका हा धमाकेदार भाग येत्या गुरु आणि शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Advertisement