महाराष्ट्राच्या जनतेला, हास्य जत्रेत सामिल झालेल्या प्रेक्षकांना, जजेस् आणि पाहुणे कलाकारांना पोट धरुन आणि मनमोकळेपणाने हसायला लावणारा आणि अव्वल स्थानावर असणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व २’. या कार्यक्रमात एखादा छोटाशा चुटकुला, सॉलिड कॉमेडी पंच कधी अचानकपणे हास्याचा धमाका करेल याचा नेम नाही. प्रेक्षकांनी विचार केले नसतील असे अनेक प्रसंग विनोदी बनवून त्यावर उपस्थित कलाकारांकडून टाळ्या, शिट्ट्या आणि वाह! वाह! अशी दाद कशी मिळवावी हे महाराष्ट्राचे विनोदवीर यांना अचूक ठाऊक असते.

रेडू .. हे नाव ऐकल्यावर तुमच्या मनात काय विचार येतो ? नाही समजतं आहे ना ? रेडू म्हणजे रेडिओ चा शॉर्टफॉर्म किंवा प्रेमात ठेवलेलं नाव. ‘रेडू’ हा एक चित्रपट असून संपूर्ण चित्रपट मालवणी भाषेत आहे . या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीज वर येत्या रविवारी १० तारखेला संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळेल . रेडू’ म्हणजे ‘रेडियो’. रेडियोवर अमाप प्रेम करणाऱ्या ७० च्या दशकातील एका सामान्य ग्रामीण युवकाची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. त्याकाळी खेडेगावात टीव्ही पोहोचला नसल्यामुळे रेडिओला अधिक महत्व होते. ज्याच्या घरात रेडिओ ते घर श्रीमंत अशी जनमानसात समजूत होती आणि त्यामुळेच ‘रेडू’ बद्दलची ग्रामस्थांमधील उत्सुकता आणि कुतूहल विनोदी पद्धतीने या सिनेमात मांडण्यात आली आहे.

मनोरंजनाचे दुसरे नाव म्हणजे झी युवा वाहिनी. सध्या प्रेक्षकांना घरी बसून नियमितपणे सोमवार ते शनिवार ७ ते १० च्या दरम्यान रोज संध्याकाळी तू अशी जवळी राहा, सूर राहू दे, वर्तूळ, फुलपाखरू, आम्ही दोघी आणि अप्सरा आली असे कार्यक्रम झी युवावर पाहण्याचे ठरलेले असते . मात्र रविवारी काय करावं हे त्यांना कळत नसतं. मग उगाच रीमोटचा चाळा करत हे प्रेक्षक जे मिळेल ते पाहतात आणि स्वतःचे मनोरंजन करतात. याच गोष्टीचा विचार करुन या रविवारी झी युवा घेऊन येतंय मनोरंजनाचा महारविवार.

स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते. अशीच एक हटके गोष्ट लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचं नाव आहे साथ दे तू मला. आपली स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या एका मुलीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल.

मंजू-शौनकच्या नव्या नात्यातला गोडवा ताजा असतानाच अनेक संकटं त्यांच्यापुढे येऊन उभी ठाकली आहेत. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलं खरं पण देशमुख कुटुंबाने अजून मंजूला घरची सून म्हणून स्विकारलेलं नाही. त्यात शौनककडून मिळालेल्या नकाराचा देवयानीला अजूनही त्रास होत आहे. त्याला मिळवण्याच्या हव्यासापोटी मंजू-शौनकच्या संसारात देवयानीची लुडबूड सुरू आहे. त्यात इतर अनेक संकट एकामागोमाग एक मंजू-शौनकच्या पाठी पडली आहेत.

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होम मिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. गेली १४ वर्ष हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या घराघरात पोहोचला असून सगळ्यांचं अविरत मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होम मिनिस्टरमध्ये सज्ज होणार आहेत आनंदी गोपाळ.

Advertisement