लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये अनेक घटना घडत आहेत. मल्हारच्या आयुष्यातून आर्वीचे अचानक निघून जाणे, तिच्या मृत्यूची बातमी येणे. लक्ष्मी आणि आर्वीचं नातं खूप जवळच होतं आणि त्यामुळे आर्वी ताई कायमच्या निघून गेल्या आहेत यावर लक्ष्मीचा विश्वास बसत नाहीये. तिला कुठेतरी खात्री आहे कि, आर्वी ताई परतणार आहे. हे सगळ घडत असतानाच मालिकेमध्ये केतकी चितळेची एन्ट्री होणार आहे. अक्काच्या मैत्रिणीची मुलगी अबोली म्हणजेच केतकी चितळे ही लवकरच मल्हारच्या घरात येणार असून, तिच्या येण्याने मालिकेला कोणते नवे वळण मिळणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडणार आहे. तेंव्हा नक्की बघा लक्ष्मी सदैव मंगलम् संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

हल्लीच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याने सगळ्याच क्षेत्रात अव्वल असावं या अपेक्षेपायी पालकांकडून त्यांचं बालपणच हिरावून घेतलं जातं. आज हा क्लास तर उद्या तो क्लास. तारेवरची ही कसरत करताना मुलं कमी पडली तरी ओरडा बसतो. पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ही मुलं दबून गेली आहेत. या सगळ्यामुळे नकळत पालक - मुलांमध्ये एक दरी निर्माण झाली आहे.

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नाते तयार झाले आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. या मालिकेमधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि इशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती. सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला. निमकरांची इशा सरंजामेंच्या मोठ्या घरात लग्न करून आली आणि रुळली.

झी युवा ने २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला 'वर्तुळ' ही नवी मालिका सुरु केलीं होती . नावाप्रमाणेच ही मालिका माणसाच्या आयुष्याचं वर्तुळ दर्शवणारी आहे. विकास पाटील , विजय आंदळकर आणि जुही गडकरी यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स स्टोरी आहे. मालिकेचं कथानक अगदी रंजक असून, ही कथा मीनाक्षी नावाच्या एका अनाथ मुलीची आहे जिचा भूतकाळ तिच्या भविष्यकाळात डोकावतोय.

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपलंय. नकार-होकाराचं नाट्य रंगल्यानंतर मधुरा-विक्रमचा साखरपुडा तर पार पडला. आता उत्सुकता आहे ती दोघांच्या लग्नाची.

स्टार प्रवाहवरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत सध्या नेहा आणि प्रतापच्या नात्यात दुरावा पाहायला मिळतोय. प्रतापच्या मनाविरुद्ध जाऊन नेहाने मायाला जेलमधून सोडवण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट प्रतापला खटकली. गैरसमज इतके टोकाला गेले की अखेर दोघांवर एकमेकांपासून वेगळं राहण्याची वेळ ओढावली. नेहा-प्रतापच्या भांडणात चिमुकली परी मात्र आईच्या मायेला पारखी होतेय. एकीकडे नेहा-प्रतापच्या नात्याचा संघर्ष सुरु असताना आता मालिकेत नचिकेत या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे नचिकेतची भूमिका साकारणार आहे.

Advertisement