एका प्रामाणिक शिक्षकाचा डॉन कसा होतो या धमाल संकल्पनेवर आधारित 'हृदयनाथ' हा सिनेमा येत्या रविवारी स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर रविवारी (२९ एप्रिल) दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या चित्रपटातून जॅकी श्रॉफ आणि आदित्य पांचोली प्रथमच मराठी चित्रपटात एकत्र आले आहेत. तर उर्मिला मातोंडकरचा ग्लॅमरस अंदाज तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकवेल.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनसीसाठी रंगलेल्या टास्कमध्ये मेघा ने बाजी मारून आता ती आस्ताद काळेनंतर कॅप्टनपदी विराजमान झाली आहे. मेघा धाडे हिने सई आणि रेशमला मागे टाकत हे पद जिंकले आहे. या टास्कनुसार मेघा, रेशम आणि सई या तिघींना कॅप्टनसीची विंग हातामध्ये धरून ठेवणे अपेक्षित होते आणि जो हा विंग शेवट पर्यंत पकडून ठेवेल तो स्पर्धक या टास्कचा विजेता ठरणार होता. रेशमने विंग सर्वप्रथम सोडून दिल्याने ती या टास्कमधून बाहेर पडली. सई आणि मेघामध्ये हा टास्क सकाळ पर्यंत चालला. शेवटी मेघा धाडे हे या टास्कची विजेती ठरली. मेघाची या आठवड्यामध्ये कॅप्टन बनण्याची इच्छा पूर्ण झाली असे म्हणणे योग्य ठरेल.

कलर्स मराठीवरील “कुंकू, टिकली आणि टॅटू” या मालिकेमध्ये रमा आणि राजचे नुकतेच लग्न झाले आहे. रमाचा गृहप्रवेश झाला असून आता टॅटू लग्न होऊन कुंकू म्हणजेच विभा कुलकर्णी यांच्या घरात आली आहे. हा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडला असून जेंव्हा विभा आणि रमा या दोन परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या स्त्रिया एकमेकांसमोर आल्या आहेत , आता काय होईल ? रमाची आधुनिक विचारसरणी आणि कुलकर्ण्यांचा परंपरावाद यांचा मेळ बसेल का? रमा या घरामध्ये कशी रमेल? या घरातील चालीरीती कश्या आपल्याश्या करेल ? विभा रमाला कसे सांभाळून घेईल ? यामध्ये टिकलीची भूमिका काय असेल ? हे बघणे रंजक असणार आहे. प्रेक्षकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका “कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये सोम ते शनि रात्री ८.०० वाजता फक्त कलर्स मराठीवर.

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याचश्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. प्रेम बऱ्याच दिवसांपासून खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये होता कि, दीपिकाच्या पोटात वाढणार मुलं हे त्याचं आहे. पंरतु त्याचा हा गैरसमज राधाने दूर केला आणि प्रेमला सांगितले कि, दीपिका ताई प्रेमला फसवत असून ते बाळ प्रेमचं नसून आदित्यच आहे. हे सत्य ऐकून प्रेमला आदित्यचा प्रचंड राग येतो.

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील वातावरण आता सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे. सकाळची सुरुवात शांततेच होणार असून ऋतुजा आणि पुष्करचा एक धम्माल डांस प्रेक्षकांन बघायला मिळणार आहे. ऋतुजाची एक वेगळी बाजू, कला आज प्रेक्षकांना दिसणार आहे. पुष्कर तर उत्तम डांसर आहेच पण या डांस मध्ये ऋतुजा त्याला डांस शिकवताना दिसणार आहे.

घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. दादासाहेब आणि त्यांच्या मुलगा सूर्या ही दोन्ही पात्रं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. दादासाहेबांच्या मुलाचे पात्रं साकारणे आणि त्यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे असे सुयश टिळक म्हणतात. ऑनस्क्रिन अँग्री यंग मॅन असलेला सुयश मालिकेत नुकतंच गीताच्या प्रेमात पडला आहे.

Advertisement