कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सेलेब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. १५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम पाच शिलेदार शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर. या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवाचा महाअंतिम सोहळा.

धमाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून झी युवावरील लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो डान्स महाराष्ट्र डान्स प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. महाराष्ट्राचा लाडका आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदे डान्स महाराष्ट्र डान्सच्या आगामी एपिसोड मध्ये विशेष अतिथीच्या रूपात पहायला मिळणार आहे.

'शतदा प्रेम करावे' आणि 'नकळत सारे घडले'च्या कथानकात येणार ट्विस्ट

सातत्याने वेगळे आणि नवनवीन प्रयोग करणाऱ्या स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळणार आहे. येत्या शनिवारी, ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता 'शतदा प्रेम करावे' आणि 'नकळत सारे घडले' या दोन मालिकांचा महासंगम होणार आहे. या दोन्ही मालिकांच्या कथानकात एक महत्त्वाचा ट्विस्ट येणार आहे.

मालिकांच्या सेटवर खूप गमतीजमती घडत असतात. स्टार प्रवाहची 'लेक माझी लाडकी' ही मालिकाही त्याला अपवाद नाही. 'लेक माझी लाडकी'च्या सेटवर नुकतीच सगळ्यांना गोड मेजवानी मिळाली. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नारळाच्या वड्या करून सर्वांना गोड खाऊ करून दिला.

स्टार प्रवाहच्या 'गोठ' या लोकप्रिय आणि आघाडीच्या मालिकेतील विलास आणि राधा या जोडीचं म्हणजेच विराचं अनेक अडचणींना, कारस्थानांना सामोरं जात लग्न झाल आहे. लग्नानंतर विराचं नवं आयुष्य सुरू होणार, की नवी संकटं पुन्हा मागे लागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यातल्या काही प्रश्नांची उत्तरं रविवारच्या महाएपिसोडमध्ये मिळणार आहेत. 'गोठ' या मालिकेचा महाएपिसोड रविवारी, १ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहने नेहमीच नवीन आणि अनुभवी कलाकारांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अनेक सुपरहिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले दादूस, अर्थात संतोष चौधरी यांच्या धमाकेदार गाण्य़ाचा परफॉर्मन्स स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या मालिकेत पहायला मिळणार आहे. आगरी कोळी हळदीच्या गाण्यासाठी लोकप्रिय असलेले लाडके दादूस या गाण्यानं धमाल उडवून देणार आहेत.

Advertisement