नाटक, चित्रपट, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, चांगली चाललेली नोकरी सोडून एक तरुणी अभिनेत्री होण्यासाठी धडपड करते... तिचं नशीबही तिला साथ देतं… स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची सुवर्ण संधी तिला मिळते आणि तिचं छोट्या पडद्यावर भव्य पदार्पणही होतं. ही प्रेरणादायी कथा आहे 'छोटी मालकीण' एतशा संझगीरीची!

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसनातसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या रविवारी गुढीपाडवानिमित्त नूतन वर्षाच्या स्वागतासाठी प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमामधील म्हणजेच सूर नवा ध्यास नवा मधील त्यांचे लाडके स्पर्धक घेऊन येत आहेत मनोरंजनाची पर्वणी ते पण तब्बल दोन तास फक्त कलर्स मराठीवर. तेंव्हा बघायला विसरू नका “सूर नवा ध्यास नवा” गुढीपाडवा विशेष भाग १८ मार्च रात्री ८ वाजल्यापासून फक्त कलर्स मराठीवर.

कलर्स मराठीवरील सरस्वती ही मालिका सुरु झाल्यापासूनच प्रेक्षकांनी तिला आपलेसे केले. मालिकेमधील मोठ्या मालकांची सरस्वती म्हणजेच तितिक्षा तावडे प्रेक्षकांची मनं कमी कालावधीतच जिंकली. सरस्वती मालिकेमध्ये तितिक्षाने आपल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या कधी प्रेमळ, कधी करारी, खंबीर तर कधी डबल रोल करताना दुर्गा बनून तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता ती मालिकेमध्ये दुर्गांच बनून नकारात्मक भूमिका साकारत आहे. तितिक्षा सोशल मीडियाद्वारे तिच्या आयुष्यातील काही क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता नुकतेच खुशबूम्हणजेच तिच्या बहिणीचे लग्न संग्राम साळवी बरोबर झाले आणि तीतीक्षाने तिच्या बहिणी बरोबरचे छानसे फोटो देखील शेअर केले.

आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता आता पुन्हा स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत पिळदार मिशी असलेल्या रांगड्या लुकमध्ये 'श्रीधर' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आपल्या व्यक्तिरेखेवर नेहमीच मेहनत घेणाऱ्या अक्षरनं 'छोटी मालकीण'साठीही खास मेहनत घेतली आहे.

कलर्स मराठी वरील “घाडगे & सून” मालिकेमध्ये प्रत्येकच सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची प्रथा आहे. मग दिवाळी असो वा होळी – रंगपंचमी असो. आता घाडगे सदन मध्ये तयारी सुरु झाली आहे ती गुढीपाडवाची. अक्षय आणि अमृताचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा असल्याने घाडगे परिवार हा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार यात शंका नाही. गुढी म्हणजे आनंदाचं प्रतिक. या दिवशी शुभकार्याचा प्रारंभ करण्याची प्रथा आहे. आपल्या कुटुंबांचे सर्व संकटापासून संरक्षण करण्यासाठी गुढी भारली जाते. अक्षय आणि अमृता यावर्षी गुढी उभारणार असून माई स्वत: श्रीखंड, पुरणाची पोळी करणार आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या लाडक्या अक्षय आणि अमृताने या दिवसाच्या काही आठवणी सांगितल्या.

Advertisement