झी युवाने अवघ्या २ वर्षांच्या कालावधीतच वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या कथा आणि त्यांच्या सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. झी युवा लवकरच आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'वर्तुळ' ही नवी मालिका सादर करणार आहे. नावाप्रमाणेच ही मालिका आयुष्याचं वर्तुळ दर्शवणारी आहे. तसेच ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स आहे. ही मालिका नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागिरं झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे. एका वर्षापूर्वी चालू झालेल्या या मालिकेतील अज्या आणि शीतली सोबत प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. अज्या आणि शीतलीच्या लग्नानंतर लगेचच अज्या पोस्टिंग झाली आणि तो कामावर रुजू झाला. सध्या अजिंक्य काश्मीरमध्ये सीमेचं रक्षण करत आहे.

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. गेली १४ वर्ष हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या घराघरात पोहोचला असून सगळ्यांचं अविरत मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होममिनिस्टरमध्ये दिवाळी निमित्त पैठणीचा खेळ आदिवासी पाड्यात रंगणार आहे.

‘सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली.. आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली’. दिवाळी म्हण्टलं की दिव्यांची आरास, रांगोळी, फराळाची सुग्रास मेजवानी आणि नातेवाईकांसोबत घालवलेले खास क्षण आठवतात. खरतर कुटुंबाला एकत्र आणणं हाच या सणाचा मुळ उद्देश. प्रेक्षकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी सज्ज आहे. ‘दिन दिन दिवाळी’ या खास कार्यक्रमातून मनोरंजनाची आतषबाजी अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, मृण्मयी देशपांडे, मानसी नाईक, पर्ण पेठे, मयुरेश पेम यांच्या धडाकेबाज डान्स परफॉर्मन्सेससोबतच स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवती आणि ‘ललित २०५’ मधील नील यांचा अनोखा अंदाज प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Advertisement