कलर्स मराठीवरील तुमच्यासाठी काय पन या कार्यक्रमामध्ये दर आठवड्यामध्ये प्रेक्षकांना काहीना काहीतरी वेगळे बघायला मिळते. या होळी आणि रंगपंचमी विशेष आठवड्यामध्ये प्रेक्षकांना “रंग महाराष्ट्राचा” या संकल्पनेवर विनोदवीरांची तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या कलाकारांचा कलाविष्कार बघायला मिळणार आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होळी आणि रंगपंचमी कशी साजरी केली जाते हे देखील बघायला मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका तुमच्यासाठी काय पनचा होळी विशेष भाग “रंग महाराष्ट्राचा” येत्या गुरु – शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर. तसेच आज काय स्पेशल कार्यकर्मामध्ये देखील होळी – रंगपंचमी विशेष भाग रंगणार आहे १ आणि २ मार्च रोजी दुपारी १.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये सरस्वतीच्या मृत्यूनंतर वाड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या ज्याला प्रेक्षक देखील साक्षीदार आहेत. त्यानंतर सरस्वती सारख्या दिसणाऱ्या मुलीला म्हणजेच दुर्गाला विद्युल आणि भुजंगने वाड्यामध्ये आणणे, सरस्वतीचे मालिकेमध्ये परतणे, राघवचे दुर्गालाच सरस्वती समजणे, हे सगळे घडत असतानाच सरस्वतीला असणारा आजार राघवला कळणे या सगळ्याच गोष्टी खूप आश्चर्यजनक होत्या. पण आता मालिकेमध्ये अजून एक रंजक वळण येणार आहे, ज्यामध्ये दुर्गा नकारात्मक होणार असून, राघव आपले प्रेम आहे याची कल्पना आल्याने ती सरस्वतीचा काटा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सरस्वतीची भूमिका साकारणारी तितिक्षा तावडे हिला अजून एका नव्या शेड मध्ये बघणे प्रेक्षकांसाठी सरप्राईझच असणार आहे. तेंव्हा आता मालिकेमध्ये दुर्गा सरस्वतीचा काटा कसा काढेल ? राघवला दुर्गाच्या मनामध्ये काय आहे हे कळेल का ? सरस्वतीला हे कळल्यावर ती कशी या संकंटाला सामोरी जाईल हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वती संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Known for its unique content of comedy and entertainment, viewers will witness a good change in the format of Zee Talkies chat show ‘Na.Sa.Te. Udyog’. The show has undergone a complete revamp and will now focus majorly on promoting Marathi Movies. In the history of Marathi television, this is the only show with two of the most talented hosts, Prasad Oak and Kranti Redkar. Anshuman Vichare, Namrata Awate, Prabhakar more will entertain the audiences with their distinctive type of comedy wherein they will be seen performing skits based on the film and its star cast that would be visiting them for promotions.

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. लोकसंगीत असो, शास्त्रीय संगीत असो वा वेस्टर्न संगीत असो या गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. या स्पर्धकांमधीलच एक जिने आपल्या सुमधुर गायकीने, सुरांनी प्रेक्षकांना आपलेसे केले आहे अशी सगळ्यांचीच लाडकी शरयू दाते ही गाण्याबरोबरच उत्तम चित्र देखील काढते. “सूर नवा ध्यास नवा” या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या भागामध्ये शरयूने भारतरत्न लता दीदी यांचे काढलेले एक सुंदर स्केच प्रेक्षकांना दाखवले. इतकेच नव्हे तर याव्यतिरिक्त देखील तिने तिच्या गुरु आरती अंकलीकर यांचे स्केच देखील काढले आहे.

Authentic Kushti is a form of wrestling we rarely get to see. But this sport is at the centre of Nitin Madhukar Rokade’s Taleem which will have its World Television Premiere on Sunday, 25th February at 12 pm and 7 pm only on Zee Talkies. Hated and betrayed, Taleem is the tale of an underdog wrestler who makes a comeback against all odds.

कलर्स मराठीवरच्या घाडगे & सून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय...घाडगेंच्या घरात सध्या भक्तिमय वातावरण आहे. जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या अक्षयसाठी आणि अक्षय-अमृताचं नवरा-बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतलाय. घाडगेच्या परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन खंडोबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात. याच वेळेस अक्षय आणि अमृताला जेजुरी मंदिराच्या ४०० पायऱ्या चढायच्या होत्या. परंतु अमृताच्या पायाला अचानक लागल्यामुळे अक्षयने अमृताला उचलून घेतले आणि खरोखरच सीन मध्ये चिन्मयने मंदिराच्या ३०० पायऱ्या चढल्या.

Advertisement