Title Song
Typography

कलर्स मराठीवर कुंकू टिकली आणि टॅटू ही मालिका येत्या सोमवार पासून म्हणजेच २ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. सुरु होत आहे. मालिकेच्या शीर्षक गीताचे नुकतेच रेकॉर्डिंग झाले असून बॉलीवूड तसेच मराठी सिनेमांमध्ये एका पेक्षा एक गाणी म्हंटल्यानंतर सुनिधी चौहान आता मराठी मालिकेकडे वळाली आहे. या मालिकेचे शीर्षक गीत सुनिधी चौहानच्या आवाजामध्ये स्वरबध्द करण्यात आले आहे. आजकल हिंदी सिनेमासृष्टीमधील बरेचसे गायक मराठीतील शीर्षक गीतांना आवाज देत आहेत.या आधीदेखील कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेचे शीर्षक गीत शाल्मली खोलगडे हिने गायले होते तर सख्या रे मालिकेचे मोनाली ठाकूर हिने गायले होते. मराठी मालिकांची शीर्षकगीते ही मालिकांसाठी खूप महत्त्वाची असतात. शीर्षकगीता मधूनच प्रेक्षकांना मालिकेच्या कथेविषयी माहिती मिळते. त्यामुळे मालिकेची टीम मालिकेच्या चित्रिकरणासोबतच मालिकेच्या शीर्षक गीताला देखील तितकेच महत्व देते.

सुनिधीने चौहान हिने हे गाण अत्यंत अप्रतिम गायले असून, त्या गाण्याला तिने तिचा एक खास टच दिला आहे ज्यामुळे हे गाणे अधिकच सुरेल वाटते. शीर्षक गीत मंदार चोळकर याने लिहिले असून रोहन – रोहन यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. शीर्षक गीताचे नृत्यदिग्दर्शन मराठीतील सुप्रसिध्द नृत्यदिग्दर्शिका दिपाली विचारे यांनी केले आहे. प्रेक्षकांना देखील हे गाणे नक्कीच आवडेल यात शंका नाही.

कुंकू, टिकलीआणि टॅटू मालिकेतील शीर्षक गीतामध्ये सारिका निलाटकर, श्वेता पेंडसे आणि भाग्यश्री न्हालवे तसेच मालिकेमध्ये आजी यांवर चित्रित केले आहे. शीर्षक गीताच्या बोलांपासून ते बायकांचा पोशाख तसेच सिग्नेचर स्टेप ते सेटअप पर्यंत सगळेच अत्यंत हटके आहे. गाणे चित्रित करताना तसेच ते लिहिताना मालिकेतील तीन विचारसरणीला प्राधान्य दिल्याचे लक्षात येते. आधुनिकता आणि पारंपरिक गोष्टी या दोन्ही गोष्टिंची उत्तमरीत्या सांगड घातलेली दिसून येते. जसे कि, नेसली नव्वारी कधी गोल साडी... तसेच म्हणावं जरी, जुनं ते सोनं, नवं ते हवं असतचं ना ...

तेंव्हा मालिकेचे हे हटके शीर्षक गीत प्रेक्षकांना ऐकायला आणि बघायला नक्कीच आवडेल यात शंका नाही. तेंव्हा बघायला विसरू नका “कुंकू टिकली आणि टॅटू” २ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Kunku Tikali Ani Tattoo Title Song Shoot 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 1.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement