Title Song
Typography

झी युवा आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी 'सूर राहू दे' ही नवी मालिका नुकतीच सादर केली. ही मालिका १ ऑक्टोबरपासून सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर सादर झाली आहे. गौरी एक साध्या सरळ भावनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका सादर करणार आहे. एक वेगळं कथानक असलेल्या या मालिकेचं शीर्षक गीत देखील खूप श्रवणीय आहे. नुकतेच सोशल मीडियावरील गाण्याच्या टिझरने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या गाण्याला आवाज दिलाय नॅशनल अवॉर्ड पटकवलेल्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी.

सूर राहू दे ही एक प्रेमकथा असून गौरी आणि संग्राम यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री उत्तम जुळून आली आहे. या प्रेमकथेचा थीमला अनुसरूनच हे शीर्षक गीत तितकंच सुंदर आणि सुरेख रचण्यात आलं आहे आणि अशा गाण्याला बेला शेंडेंचा सुमधुर आवाज अगदी साजेसा आहे. या गाण्याला सोशल मीडियावर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

या गाण्याबद्दल बोलताना बेला शेंडे म्हणाल्या, "मला या मालिकेचं नाव खूपच आवडलं. मंदार देवस्थळी यांचे खूप चाहते आहेत, मी स्वतः त्यांची खूप मोठी चाहती आहे आणि त्यांच्या मालिकेसाठी शीर्षक गीत गाण्याची मला संधी मिळाली याचा मला आनंद आहे. हे गाणं विशाल जगदीश यांनी स्वतः शब्दबद्ध आणि कंपोज केलं आहे. मी या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे आणि मालिकेसोबतच हे शीर्षक गीत देखील प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करते."

Watch the Title Song Here

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement