आजकाल सर्वत्र फोफावलेल्या सोशल मीडियाच्या युगात सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत प्रत्येकाचीच या समाज माध्यमात दिसण्या-वावरण्याची स्पर्धा सुरु आहे. मग त्यात सेलिब्रिटीं कसे बरं मागे राहतील? त्यांच्यासाठी तर हे माध्यम सुवर्णमृगच जणू! पण आपल्या मराठी कलावंतांना याचे विशेष सोयरसुतक नाही. काही अपवाद वगळता आपलं काम भलं आणि आपण भले असा विचार करणारे मराठी कलावंत अजूनही आहेत! पण या 'प्लॅटफॉर्मचा' वापर न करणाऱ्यांविषयी त्यांचे फॉलोअर्स बोंबा मारताना दिसतात. अश्याच सेलिब्रिटींपैकी 'क्षिती जोग'!

मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. सध्याच्या काळात हे कुतूहल शमवण्याचं काम वेगवेगळी समाजमाध्यमं आणि स्वतः सेलिब्रिटी सातत्यानं करत असतात. अशाच एका 'सेलिब्रिटी' हे बिरुद मिरवणाऱ्या एका अभिनेत्याच्या आयुष्याबद्दलचे दोन टोकाचे दृष्टिकोन उलगडणारं ओंकार अरविंद कुळकर्णी लिखित आणि मंदार देशपांडे दिग्दर्शित ‘नॉक! नॉक! सेलिब्रिटी’ हे नवं नाटक. या अत्यंत वेगळ्या विषयावरील नाटकाची निर्मिती संतोष रत्नाकर गुजराथी, मनोज पाटील, विजय केंकरे यांच्या ‘विप्लवा’ + ‘प्रवेश निर्मित’ केले असून या नाटकाचे सादरकर्ते संतोष रत्नाकर गुजराथी आहेत. लोकप्रिय अभिनेते सुमीत राघवन आणि क्षिती जोग यांच्या अप्रतिम अभिनयाने सजलेल्या या नाटकातील त्यांच्या या भूमिका विलक्षण नाट्यानुभव देणाऱ्या आहेत.

हिंदू साम्राज्याचा ध्यास घेऊन कायमच अपराजित राहिलेले सेनानायक, ज्यांनी युगपुरुष शिवाजी महाराजांचे हिंदू साम्राज्य प्रस्थापित करण्याचे स्वप्न बऱ्याच अंशी सत्यात उतरवले. दिल्लीत भगवा फडकावणारे पहिले मराठी सेनानी... शक्ती आणि बुद्धीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव पेशवे. त्यांच्या जीवनावर आधारित 'अजिंक्य योद्धा - श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ' या महानाट्याचा भव्य शुभारंभ अंधेरी येथील होली फॅमिली पटांगणात नुकताच झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे अध्यक्ष ॲड आशिष शेलार होते. या वेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अमित साटम, गायक नंदेश उमप, आदर्श शिंदे आदींची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर या खास प्रयोगासाठी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. या महानाट्याचे आयोजन केसरबेन मुरजी पटेल यांनी केले होते. अजिंक्य योद्ध्याचा इतिहास आणि कीर्ती अनुभवण्यासाठी या वेळी हजारोंनी रसिकवर्ग जमला होता.

काही दिवसांपूर्वी प्रिया बापट हिने सोशल मीडियावर एक गुड न्युज आहे अशी पोस्ट शेअर केली होती. दादरच्या प्रभादेवी परिसरातही "दादा, मी प्रेग्नन्ट आहे.” असे होर्डिंगही लावण्यात आले होते. अनेकांनी या बाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडले...

हि जुगलबंदी रंगणार दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आल्यावर, जो काही अनुभव रसिक प्रेक्षक अनुभवतात तो प्रचंड आनंददायी असतो. मग हा अनुभव जर रंगभुमीवरचा असेल तर तो अधिक रंगतदार, स्वर्णिम ठरतो. त्या दिग्गजांचा अभिनय, त्यांच्यातली संवादांची जुगलबंदी, विषयाच्या आशयाला आणि सादरिकरणाला अतुलनिय उंचीवर पोहोचवते. अगदी हाच आणि असाच एक सुखद अनुभव सर्व रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत प्रस्तुतकर्ते चैतन्य गिरिश अकोलकर आणि डिज़िटल डिटॉक्स ही निर्मिती संस्था - “पियानो फॉर सेल” या नाटकाद्वारे!

अभिनेता सुशांत शेलार आणि आस्ताद काळे यांची घनिष्ठ मैत्री ‘बिग बॉस’ कार्यक्रमात सगळ्यांनीच बघितली. आपल्या बेधडक व स्पष्ट वक्तेपणामुळे ‘बिग बॉस’ कार्यक्रम गाजवल्यानंतर हे दोघेजण पुन्हा एकत्र येत आपला नवा अंदाज प्रेक्षकांना दाखवायला सज्ज झाले आहेत. रंगनील निर्मित ‘MR & MRS लांडगे’ या आगामी नव्या नाटकातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारी १३ ऑक्टोबरला दुपारी ४.३० वा. या नाटकाचा शुभारंभ वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात होणार आहे.

Advertisement