News
Typography

मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य गौरव सोहळा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात कमालीची चुरस असलेल्या या सोहळ्यांत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. यात “संगीत देवबाभळी" या नाटकाने बाजी मारली.


‘भरत जाधव’ यांना "वेलकम जिंदगी" साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर ‘मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते’ यांना "संगीत देवबाभळी" साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर ऋतुजा बागवे ला "अनन्या" या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा विशेष पुरस्कार मिळाला.

Full List of Winners - Click Here

या सोहळ्यात सारेगमप लिटिल चॅम्प च्या अंतिम फेरीतील गायक ‘प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन’ यांनी नाट्य संगीत सादर करून कार्यक्रमात बहार आणली. सोनाली कुलकर्णी आणि अनिता दाते यांनी सादर केलेली "सखाराम बाईंडर” मधील लक्ष्मी आणि चंपा, ‘संजय मोने’ यांनी सादर केलेला "तो मी नव्हेच” मधील लखोबा लोखंडे, तसेच ‘डॉ. अमोल कोल्हे आणि प्रतीक्षा लोणकर’ यांनी सादर केलेला "वि. वा. शिरवाडकर" यांच्या "कौंतेय" मधील प्रवेश सादर करून रसिकांची मनं जिंकून घेतली.

विख्यात नाटकांचे निवडक प्रवेश, बहारदार नृत्याविष्कार आणि विनोदी प्रहसने यांनी रंगलेला हा नाट्यगौरव सोहळा येत्या 8 एप्रिलला झी मराठीवर सायंकाळी ७ वा. प्रसारित होणार आहे.

Promos

Zee Natya Gaurav Awards 2018 Winners 10 Best Commercial Play

 

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement