News
Typography

रंगभूमी आणि कलेचा वारसा असलेल्या नाट्य क्षेत्रातील कार्यरत असलेल्या रंगकर्मींना सन्मानित करणारे, त्यांच्या कामाला दाद देणारेआणि त्याचं कौतुक करणारे प्रतिष्ठित आणि मोलाचं व्यासपीठ म्हणजे झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा. हा सोहळा काही दिग्गजकलाकार आणि रंगकर्मी यांच्या उपस्थितीत पार पडला. बहारदार परफॉर्मन्सेस आणि मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या पुरस्कारसोहळ्यात रंगकर्मींनी अनेक पुरस्कार पटकावले. यंदा झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाला १ लाख रुपयांचेरोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं.


नाटक क्षेत्रातील हुकमी एक्का असलेला अभिनेता भरत जाधव यांनी नेहमीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलेलं आहे. वेलकम जिंदगीमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौम्या जोशी लिखित वेलकम जिंदगी हे नाटक एका चैतन्यशील वृद्ध माणसावर आधारित आहे ज्याला खूप जगायचंय आणि एका ११८ वर्ष जगलेल्या चायनीज गृहस्थाचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे.

Full List of Winners - Click Here

सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार पटकावल्यानंतर भरत जाधव आपल्या आनंद व्यक्त करताना म्हणाले, "मी सर्वप्रथम या नाटकाचेदिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि निर्माते शेखर ताम्हाणे यांचे आभार मनू इच्छितो ज्यांनी मला या नाटकात कास्ट केलं आणि माझ्यावरविश्वास दाखवला. वय वर्ष ७५ असलेल्या इसमाची भूमिका करणं खूप आव्हानात्मक आहे पण वेळोवेळी प्रेक्षकांनी देखील आमच्यावरआणि आमच्या कामावर प्रेमाचा वर्षाव केला. हा पुरस्कार वेलकम झिंदगीच्या संपूर्ण टीमचा आहे, सगळ्यांची मेहनत आणि कष्ट यामागेआहेत."

रंगकर्मींच्या विजयाचे हे अदभूत क्षण पहारायला विसरू नका झी नाट्य गौरव २०१८ पुरस्कार सोहळ्यात येत्या 8 एप्रिलला सायंकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Zee Natya Gaurav Awards 2018 Winners 13 Bharat Jadhav

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement