News
Typography

मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. सध्याच्या काळात हे कुतूहल शमवण्याचं काम वेगवेगळी समाजमाध्यमं आणि स्वतः सेलिब्रिटी सातत्यानं करत असतात. अशाच एका 'सेलिब्रिटी' हे बिरुद मिरवणाऱ्या एका अभिनेत्याच्या आयुष्याबद्दलचे दोन टोकाचे दृष्टिकोन उलगडणारं ओंकार अरविंद कुळकर्णी लिखित आणि मंदार देशपांडे दिग्दर्शित ‘नॉक! नॉक! सेलिब्रिटी’ हे नवं नाटक. या अत्यंत वेगळ्या विषयावरील नाटकाची निर्मिती संतोष रत्नाकर गुजराथी, मनोज पाटील, विजय केंकरे यांच्या ‘विप्लवा’ + ‘प्रवेश निर्मित’ केले असून या नाटकाचे सादरकर्ते संतोष रत्नाकर गुजराथी आहेत. लोकप्रिय अभिनेते सुमीत राघवन आणि क्षिती जोग यांच्या अप्रतिम अभिनयाने सजलेल्या या नाटकातील त्यांच्या या भूमिका विलक्षण नाट्यानुभव देणाऱ्या आहेत.

Knock Knock Celebrity Kshitee Jog 01

'विप्लवा' या संस्थेद्वारे मनोरंजन निर्मितीत पाऊल टाकलेल्या संतोष रत्नाकर गुजराथी यांनी दर्जेदार कलानिर्मिती निर्माण करण्याचे प्रमुख उद्दिष्ठ ठेऊन 'ॲब्सोल्युट' या त्यांच्या पहिल्या नाटकाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मालिका निर्मितीत प्रवेश करीत 'रुद्रम' आणि 'कट्टी बट्टी' या मालिकांची सहनिर्मिती केली आहे. तसेच व्यावसायिक रंगभूमीवर संजय नार्वेकर अभिनीत 'घरात मॅरीड बाहेर बॅचलर' या आगल्या वेगळ्या नाटकाची निर्मिती केली असून विविध विषयांवरील दर्जेदार नाट्यनिर्मितीसाठी त्यांच्या सोबत दिग्दर्शक मंदार देशपांडे हे क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

Knock Knock Celebrity Sumeet Raghvan 01

लिखाण, दिग्दर्शन, अभिनय यासह सर्वच बाबतीत ‘नॉक! नॉक! सेलिब्रिटी’ हे नाटक उजवं ठरत असून मराठी कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हे नाटक अभिरुची संपन्न असल्याची पावती दिली आहे. या नाटकाचे मोजकेच प्रयोग सादर झाले असून त्या प्रयोगांना मान्यवरांनी विशेष प्रतिसाद दिल्याने आता हे नाटक सर्वसामान्य रसिकांसाठी सादर करण्याचा निर्णय घेत निर्मात्यांनी येत्या २९, ३० मार्च रोजी बोरीवली, दादर तसेच ६, १३ एप्रिल रोजी प्रभादेवी – दादर येथील नाट्यगृहांमध्ये या नाटकाचे प्रयोग जाहिर केले आहेत.

Knock Knock Celebrity Kshitee Jog

ओंकार कुळकर्णी आणि मंदार देशपांडे या नव्या दमाच्या लेखक दिग्दर्शक जोडगोळीचं ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर रुजू झालं आहे. या नाटकाचा आजच्या काळाशी सुसंगत वेगळा विषय आणि नव्या पठडीतील सादरीकरण सामान्य प्रेक्षकालाही भुरळ घालणारं असून ते प्रत्येकाने पहावं म्हणजे एका सेलिब्रिटींचं काय आयुष्य असतं? आणि सामान्य प्रेक्षक त्यांच्याकडे कसं पाहतो? याचं झक्कास मिश्रण लेखक – दिग्दर्शकाने या नाटकात केले आहे. आजचं सोशल मीडियाचं जग कसं आहे? आणि त्याचा सर्वांवर होणारा परिणाम - दुष्परिणाम याचं यथार्थ दर्शन आपल्याला ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ पहाताना अंतर्मुख करते. या नाटकाचं नेपथ्य-प्रकाश प्रदीप मुळ्ये यांचं असून संगीत राहुल रानडे यांनी दिले आहे. वेशभूषा श्वेता बापट यांनी केली असून प्रसिद्धी जाहिरात संकल्पना सचिन सुरेश गुरव यांची आहे.

Knock Knock Celebrity Sumeet Raghvan

‘नॉक! नॉक! सेलिब्रिटी’ हे नाटक प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश म्हापुस्कर, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, शुभांगी गोखले, सुचित्रा बांदेकर, चिन्मयी सुमीत, सुहिता थत्ते, माधवी पुरंदरे, समर नखाते, समीर विद्वांस, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, सागर देशमुख, अभिजित खांडकेकर, आरती वाडगबाळकर, ओमप्रकाश शिंदे, संकर्षण कऱ्हाडे, उज्वला जोग, कौशल इनामदार, ऋतुजा बागवे इत्यादी मान्यवरांनी हे नाटक त्यांना आवडलं असल्याची पावती दिली आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement