आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी... अशी आणि असंख्य वर्णने आईबाबतीत ऐकायला मिळतात. आई म्हणजे माणसातील देवच जणू. मग अशा आईसाठी आपण काय करतो.. मातृदिनानिमित्त असाच काहीसा प्रश्न उपस्थित केला आहे 'सांग ना गं आई तुला काय हवे' या नव्या कोऱ्या गीतातून. नक्की पहा आणि अनूभवा त्यातील हृदयस्पर्शी अर्थ.

गायिका सावनी रविंद्रचं नुकतंच लग्न झालं आहे. सावनीच्या लग्नानंतर तिचं पहिलं रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. जे सावनीने आपल्या पतीला लग्नानंतर दिलेलं सरप्राइज गिफ्ट आहे.

मनोरंजन क्षेत्रात नेहमीच काही ना काही नवीन होत असते. आता संपूर्ण मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील कलाकाराच्या सहकार्याने “ आकापेला” या संकल्पनेवर आधारीत गाणे तयार केले आहे. काही दिवसातच लाखोंचे हिट्स या गाण्याला मिळत आहे. कौतुकांचा वर्षाव खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्वीट द्वारे केल. अमेय खोपकर यांच्या ए.व्ही.के एंटरटेन्मेंटच्या युट्युब चॅनलचा हा पहिला व्हिडीओ. विनय प्रतापराव देशमुख सरसमकर यांची सकंल्पना व दिग्दर्शन केलेला हा व्हिडिओ आहे. पहिला मराठीतील माईम थ्रू टाईम मुळे लोकांपर्यंत पोहचलेला विनय देशमुख याचे हे दुसरे प्रसिद्ध होणारे गाणे आहे. अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंटने, विक्रांत स्टुडीओच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या या व्हिडीओची निर्मिती स्वाती खोपकर यांनी केली आहे. तब्बल सहासष्ट कलाकार, चव्वेचाळीस विविध नवी आणि जुनी गाणी या सर्वाचे मिळून एक गाणे “आकापेला”.

‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या लोकप्रिय नाटकांचे ‘निर्माते अमेय विनोद खोपकर याची कलारसिकांना वेगळी ओळख करून द्यायला नको. आता त्यांची निर्मिती संस्था अमेय विनोद खोपकर (एव्हीके) एंटरटेन्मेंट युट्युब चॅनल क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांच्या पहिल्या व्हिडीओचे वैशिष्टे म्हणजे कोणत्याही वाद्याविना तयार झालेले मराठी गाणे, या व्हिडीओ मध्ये दिग्गज अभिनेते,अभिनेत्री, गायक, संगीतकारांसह तब्बल ६४ कलावंताचा समावेश आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून बॉलीवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

आदर्श शिंदे यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ ह्या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. गणेश निगडे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि श्रावणी सोळस्करांनी दिग्दर्शित केलेलं, ‘संभळंग ढंभळंग’ गाण्याची निर्मिती ‘टियाना’ प्रॉडकशन्सने केली आहे.

आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन कविता यांनी केले आहे. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत. कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत.

Page 1 of 5
Advertisement