Music Video
Typography

आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने आजच्या तरुणाईला भुरळ पाडणारा निखिल रानडे आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे. परदेशात पहिल्यांदाच चित्रित करण्यात आलेल्या मराठी "इशारा तुझा" या म्युझिक सिंगलची निर्मिती करून मराठी सिनेसृष्टीत झालेला बदल दाखवून दिला. फोटोग्राफी व्यवसायात वेडिंग फोटोग्राफी, कँडिड फोटोग्राफी तसेच सिनेमॅटिक वेडिंग व्हिडीओ तसेच डेस्टिनेशन वेडिंग यात हातखंडा असलेल्या निखिल यांनी आपली संगीताचीही आवड जोपासली. निर्माता, दिग्दर्शक आणि गायक म्हणून आपली एक ओळख त्यांनी निर्माण केली. "बेफिकर" हा त्यांचा नवीन म्युझिक सिंगल आपल्या भेटीला आला आहे.

निखिल रानडे यांनी आपल्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत "झोका तुझा"," इशारा तुझा" या मराठी गाण्यांचे तर "जोगी" या हिंदी गाण्याचे दिग्दर्शन तसेच निर्मिती केली. "यार" या निहार शेंबेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या गाणं निखिल यांनी गायलं असून त्यात अभिनयसुद्धा केला आहे., तर "इशारा तुझा" या गाण्याच्या दिग्दर्शनासोबतचं गायनाची, अभिनयाची तसेच निर्मितीचीही धुरा सांभाळली होती. निखिल यांनी आपल्या प्रत्येक गाण्यांमधून नवीन कलाकारांना संधी दिली. नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळावं या उद्देशाने कायम प्रयत्नशील असलेल्या निखिल यांचे येत्या वर्षी ३ वेगवेगळ्या जॉनरचे म्युझिक सिंगल आपल्या भेटीला येणार आहे.

"बेफिकर" हा म्युझिक सिंगल १६ फेब्रुवारी प्रदर्शित झाला असून निखिल यांनी हे गाणं गायलं आहे. पेपी ट्रॅक असलेलं हे गाणं तरुणाईला आपल्या तालावर नाचावयास भाग पाडणार आहे. अतुल जोशी यांनी लिहिलेल्या शब्दांना निहार शेंबेकर यांनी संगीतबद्ध केले आहे. राजीव रानडे यांनी या सिंगलचे छायाचित्रण केले असून स्कॉटलंड येथील निसर्गरम्य स्थळांचे दर्शन आपल्याला या गाण्यात दिसून येणार आहे. "बेफिकर" या गाण्यानंतर निखिल यांचे "सांग ना" "मन गुंतते" हे आगामी म्युझिक सिंगल्स आपल्या भेटीला येणार आहेत.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement