Music Video
Typography

प्रेम.. प्रेमाची व्याख्या म्हणजे स्पंदन.. स्पंदन म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्ती ला बघितल्यावर आपल्या आतून एक आवाज नकळत पणे येतो, मग त्याची धावपळ जोरात सुरु होते आणि मग त्या धावपळीच प्रेमात रूपांतर होतं.. या सगळ्या गोष्टी करणारा एकचं "स्पंदन". दोघांची मनं जुळून आली कि एक स्पंदन तयार होतं. अशाच एका स्पंदनाची गोष्ट नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी बघायला मिळाली.. SKB फिल्म ने बनवलेलं हे गुडीपाडवा स्पेशल गाणं मुळात हे फक्त गाणं नसून एक सुंदर प्रेम कथा आहे.. १८ मार्च २०१८ या दिवशी youtube वर प्रदर्शित झालं.

समोरासमोर राहणाऱ्या एका मुलाची आणि मुलीची कथा. या दोन प्रेमळ व्यक्तींशिवाय प्रेम कथा तयार होऊच शकत नाही आणि त्या कथेतील पात्र साकारलेलं आहे गौरव घाटणेकर आणि ब्रिजेश्वरी शर्मा यांनी. स्वप्नील केशरी भिसेकर यांनी त्यांचीच हि सुंदर गोष्ट त्यांच्याच दिग्दर्शनातून मांडली आहे.. ओंकार पुंड यांच्या उत्तम छायाचित्रीकरणा मुळे या प्रेमकथेला एक वेगळाच लुक आलेला आहे. या प्रेमकथेचा बोल विकास परदेसी आणि रोहन गायकवाड यांनी लिहिलेले आहेत आणि या कथेचा एका सुंदर गाण्यात रूपांतर राहुल दुर्गुडे यांनी केलं आहे. तसेच महेश मोंढे आणि प्रांजळ शेवाळे यांनी आपला सुंदर आवाज देऊन या प्रेमकथेला आणि गाण्याला एक वेगळचं वळण दिलेलं आहे.. आज वर आपण बरेच लव्ह स्टोरी बघत आलो आहोत पण " स्पंदन " या गाण्यातून तुम्हाला आपली मराठी संस्कृती जपून आपल्या मराठी सणाला कुठेही गालबोट न लावता एक सुंदर लव्ह स्टोरी बघायला मिळेल.. हे गाणं बघितल्यावर तुम्हाला खरंच प्रेम करण्याची वेगळी पद्धत समजेल.

प्रेम हे न बोलता न भेटता हि व्यक्त शकतो हे या गाण्यातून तुम्हाला दिसेल ते कसा हे फक्त गाणं बघतल्यावर समजेल कारण ते सांगण्यापेक्षा बघण्यात गम्मत जास्त आहे.. आणि एक गुड न्युज नुकताच राजस्थान मध्ये झालेल्या "चंबल इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल" मध्ये "SKB फिल्म" ने बनवलेल्या दिवाळी स्पेशल "खुष्णुमा" या गाण्याला आपल्या भारताकडून re-presnt केलं होता आणि त्यांना "बेस्ट म्युसिक व्हिडीओ " हा अवॉर्ड मिळाला. त्यात एका गरीब घरातल्या वडील आणि मुली ची गोष्ट दाखवली आहे. गरीब घरातील दिवाळी कशी साजरी होते हे त्या गाण्यात दाखवलेलं आहे.. SKB फिल्म च्या बऱ्याच शॉर्टफिल्म्स आणि गाणी आपल्याला युट्युब वर बघायला मिळतील.. आणि सध्या SKB team चा वेब सेरिज वर काम चालू आहे.. असेच वेगवेगळे contain बघण्यासाठी यांचा "SKB " हे YouTube चॅनेल subscribe करा.. वेगळ्या vision ने वेगवेगळ्या गोष्टी लोकांना दाखवण्याचा SKB & team चा प्रयत्न असतो.. आणि तो शेवटपर्यंत चालूच असणार आहे..

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement