Music Video
Typography

आदर्श शिंदे यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ ह्या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. गणेश निगडे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि श्रावणी सोळस्करांनी दिग्दर्शित केलेलं, ‘संभळंग ढंभळंग’ गाण्याची निर्मिती ‘टियाना’ प्रॉडकशन्सने केली आहे.

टियाना’ प्रॉडकशन्सचे सुजित जाधव म्हणतात, “आम्ही युवा आणि महत्वाकांक्षी दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार आणि प्रोड्यूसर्स असे एकत्र आलो आहोत. आमचा पहिला प्रकल्प मराठी संगीत अल्बम ‘प्रीत तुझी’ आहे, जो एप्रिल २०१८ मध्ये लॉन्च होणार आहे. ‘संभळंग ढंभळंग’ हे ‘प्रीत तुझी’ अल्बम मधील ४ गाण्यांपैकी एक गाणं आहे. आमचे बोधवाक्य मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार मनोरंजन तयार करणे आहे.”

Watch the Song Now

आदर्श शिंदे, हे संगीत आणि गायन परंपरा असलेल्या नावाजलेल्या 'शिंदेशाही' कुटुंबातील एक मोठं नाव! आदर्श शिंदे आपल्या उडत्या चालीच्या गाण्यांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील प्रसिद्ध पार्श्वगायक, आनंद शिंदे आणि आजोबा प्रल्हाद शिंदे, ज्यास स्वरसम्राट म्हणून आजही ओळखलं जातं.

5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 5.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement