Music Video
Typography

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी... अशी आणि असंख्य वर्णने आईबाबतीत ऐकायला मिळतात. आई म्हणजे माणसातील देवच जणू. मग अशा आईसाठी आपण काय करतो.. मातृदिनानिमित्त असाच काहीसा प्रश्न उपस्थित केला आहे 'सांग ना गं आई तुला काय हवे' या नव्या कोऱ्या गीतातून. नक्की पहा आणि अनूभवा त्यातील हृदयस्पर्शी अर्थ.

जी आई आपल्यासाठी जीवाचं रान करते तिच्यासाठी आपण काय काय केले पाहिजे हेच जणू गीतकार आणि निर्माता गणेश साबळे या गाण्यातून सांगू इच्छितात. हे गीत गायले आहे झी मराठी वरील सारेगमप चा 2nd Runners-up गायक 'अक्षय घाणेकर' ने, तर या गीताला संगीत दिले आहे तेजस चव्हाण यांनी. या गाण्याच्या चित्रीकरणाची जबाबदारी पेलली आहे दिग्दर्शक आकाश थिटे यांनी. कलाकार रणजीत कांबळे आणि रश्मी घाटपांडे यांनी आई-मुलाची हृदयस्पर्शी कहाणी यात जीवंत केली आहे. २४ तासांत हे गीत १० हजार लोकांनी पाहिले.

आईसाठी नक्की पहा 'सांग ना गं आई'

Lyrics and Produced by: Ganesh Ashok Sable
Music Direction: Tejas Chavan
Direction: Akash Thite
Singer: Akshay Ghanekar

Know More about Lyricist Ganesh Sable - Click Here

1.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 1.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement