Music Video
Typography

सावनी रविंद्रने फिल्म प्लेबॅक सिंगींगसोबतच मॅशअपच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. तिच्या मॅशअप्सना नेहमीच तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलंय. त्यामूळेच आता सावनी आपलं ‘टिक-टिक वाजते – पियु बोले’ हे मॅशअप घेऊन आलीय. संगीतकार गौरव डगावकरसोबत सावनीने हे मॅशअप गायलंय.

सावनी आणि गौरव ह्याअगोदर वन वे तिकीट चित्रपटातल्या ‘मस्त मलंगा’ गाण्यासाठी एकत्र आले होते. ह्या गाण्यावर चाहत्यांच्या प्रेमासोबतच पुरस्कारांचीही बरसात झाली होती. सावनी आपल्या नव्या मॅशअपविषी सांगते, “गौरव भेटला की आमची नेहमीच जॅमिंग सेशन रंगतात. अशाच एका जॅमिंग सेशन दरम्यान हे गाणं आकाराला आलं. गौरव टिकटिक वाजते गात होता. आणि मी पियु बोले गाऊ लागले. आणि मॅशअप रंगलं. मग आम्ही हे मॅशअप रेकॉर्ड करायचे ठरवले. गौरव आणि माझं हे पहिलं मॅशअप आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे, कानसेनांना हे मॅशअप खूप आवडेल.”

साँगफेस्ट इंडिया निर्मित ह्या गाण्याचं चित्रीकरण कर्जतच्या तन्मय फार्म्समध्ये झाले आहे. बॉलीवूडचे सुप्रसिध्द अरेंजर दिपजंन गुहा ह्यांनी म्युझिक अरेंजमेंट केली असून शशांक आचार्यने बासरी वाजवली आहे तर सागर मोंडलने कझोन बॉक्स प्ले केला आहे.

Savaniee Ravindrra Mashup Song Tik Tik Vajate 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News