मराठीतला रॉकस्टार रोहित राऊत आणि युथ सेन्सेशन जुईली जोगळेकरचं गेल्या महिन्यात ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’ हे पहिलं मॅशअप आल्यावर आता रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग रिलीज झालंय. इकोनेक्टवरून रोहित-जुईलीचं फ्रेंडशीप कव्हर साँग आलंय. ‘तेरा-यार हूँ मै- तेरी यारियाँ’ हे ह्या दोघांचे मॅशअप जेवढं सुमधूर आहे, तेवढाच गाण्याचा व्हिडीयोसुध्दा सुरेख चित्रीत केलेला आहे.
ह्या गाण्याविषयी रोहित राऊत सांगतो, “लोकाग्रहास्तव आम्ही पहिलं मॅशअप केलं. ते आमच्या चाहत्यांना एवढं आवडलं, की त्यांनी अजून एक गाणं गाण्याचा आग्रह धरला. म्हणून आता हे दूसरं कव्हर साँग घेऊन येतोय. आणि आमच्या चाहत्यांना वचन दिल्याप्रमाणे, अजून काही कव्हर साँग घेऊन येण्याचा आमचा मानस आहे.”
गायिका जुईली जोगळेकर म्हणाली, “माझ्यासाठी आणि रोहितसाठी यंदाचा फ्रेंडशीप डे खास आहे. कारण आमच्या मैत्रीला यंदा एक दशक पूर्ण होते आहे. त्यामूळे दूसरं कव्हर साँग करताना मैत्रीविषयीचीच दोन गाणी आम्ही निवडली.”
Watch the Cover Song Here