Music Video
Typography

पाऊस म्हटलं की प्रत्येक मराठी संगीतप्रेमीला आठवतो तो मिलिंद इंगळे आणि सौमित्र यांचा पाऊसगाण्यांचा अल्बम 'गारवा'. या सदाबहार अल्बमला या वर्षी २० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मिलिंद आणि सौमित्र रसिकांसाठी घेऊन आले आहेत एक नवीन हळूवार गझल - 'तिला सांगा कुणी'.

या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचं चित्रीकरण इगतपुरी जवळील निसर्गरम्य अशा ड्रमस्टिक लगून रिसाॅर्ट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात करण्यात आलं आहे. या व्हिडिओत मिलिंदबरोबर सहनायिका आहे तुझं माझं ब्रेकअप फेम मीरा जोशी. हा व्हिडिओ 9x झकास, मायबोली या वाहिन्यांवर, तसेच फेसबुक, युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Watch the Song Here

मिलिंद-सौमित्र च्या नवीन कलाकृतीची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी 'तिला सांगा कुणी' हे गीत नक्कीच कर्णमधुर आणि नेत्रसुखद मेजवानी ठरली आहे. या व्हिडिओची निर्मिती केली आहे इनरव्हाॅईस प्राॅडक्शन्स प्रा. लि. यांनी आणि याचं दिग्दर्शन केलं आहे निलेश कुंजिर यांनी.

Tila Sanga Kuni Milind Ingale 01

 

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement