Music Video
Typography

श्रावण सुरू झाला की एका पाठोपाठ एक सणांची रांग लागते. प्रत्येक सणाची आपली वेगळीच धमाल... वेगळीच मस्ती.... याच अनोख्या धमाल-मस्तीने नटलेला सण म्हणजे दहीहंडी. थरांचा थरार सादर करताना आपल्या माणसाला जपण्याची वृत्ती दरवर्षी या सणादरम्यान पाहायला मिळते. जल्लोषात साजरा होणाऱ्या या सणाचा जोश वाढवणारं संदीप कुलकर्णी यांच्या आगामी चित्रपटाचं धमाल गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या चेहऱ्यावरील मिश्किल भावांनी गाण्याला आणली वेगळीच मजा

बेभान गोविंदांच्या रंगील्या खेळीला सलाम करणारं हे दहीहंडीचं खास गाणं. ज्यात संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या मिश्कील हावभावांनी चार चांद लावले आहेत. संदीप कुलकर्णींचा हा अंदाज पहिल्यांदाच या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे.

करंबोला प्रोडक्शन्स प्रस्तुत मनाला भिडणारं हे गाणं शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबध्द केलं असून चंद्रशेखर सानेकर यांनी गोविंदांचा थरार आणि जिद्द शब्दबध्द केली आहे. तर हे शब्द थेट काळजाला भिडतात ते प्रवीण कुवर यांच्या आवाजात. संदीप कुलकर्णी आणि महेंद्र अटाळे निर्मित हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे, हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी लवकरच यावरून पडदा उठणार आहे.

Watch the Song Here

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement