Music Video
Typography

मराठीतील ईश्वर भक्तीपर काव्यरचनेला फार मोठी प्रगल्भ अशी परंपरा लाभलेली आहे. सध्या भारतभर सुरु असलेला नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा केला जात आहे. त्यात देवींची गाणी लक्ष वेधून घेत आहेत. नुकतेच या आदिशक्तीवरील एक गीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. शब्द मनांत, ओठांवर सतत रहावेत, अशा शब्दरचनेवर कवी अरुण सांगोळे यांनी भर दिला असून संगीतकार प्रसाद फाटक यांनी संगीतातल्या वेगवेगळ्या प्रचलित रागांच्या माध्यमातून आगळेवेगळे संगीत देण्याचा प्रयत्न केला आहे.

देवी म्हणजे शक्ती! तिची अनेक रूपे आहेत. शक्ती हे तिचे मूळतत्व. हे मूळ परब्रह्माची, परमतत्वाची, परमपुरुषाची शक्ती आहे. या आदिशक्तीवर सत्व रज तमाचा, काळाचा तसेच दिशांचा परिणाम होत नाही. ही आदिशक्ती सर्वत्र,सदैव, सर्वकाळ असणारी अशी आहे. सदर गीतात अंबामातेचा महिमा विशद केला आहे. संगीतकार प्रसाद फाटक यांनी भिन्न षंड्ज, जोग आणि पुरविता धनश्री या तीन रागांचा प्रामुख्याने वापर या गीतात केल्यामुळे या गाण्याने कमालीची उंची गाठली असल्याचे दिसून येत आहे. त्या रागांचे आरोह अवरोह वाद्यांवर वाजवून त्या रागांचे वातावरण निर्माण करण्याचा प्रसाद फाटकांचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य असा आहे. सा रे ग म फेम शाल्मली सुखटणकर आणि सायली सामंत यांचा लाभलेला स्वर यामुळे "जय अंबिके जय रेणुके" हे गीत सर्वांना आवडेल याची निर्मात्यांना खात्री वाटते.

Watch the Song Now

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement