Music Video
Typography

गीतकार, गायक वैभव लोंढे यांच्या आवाजातील 'खंडेराया झाली माझी दैना' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट ची प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती चेतन गरुड प्रॉडक्शनने केली आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये गाण्याच्या भाषेला साजेसा असा एक माहोल निर्माण केला गेला आहे. ट्रेडीशनल गाण्याला रोमँटिक टच देऊन एक नवे व्हर्जन सादर करण्याचा प्रयत्न संगीत दिग्दर्शकाने केला आहे.

वैभव लोंढे यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून संगीत दिग्दर्शनही केले आहे. साईशा पाठक व वैभव लोंढे यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन तेजस पाटील यांनी केले आहे. रवी उछे यांनी गाण्याचे छायाचित्रण केले आहे तर रोहन माने यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. वेगळ्या बाजातील 'खंडेराया झाली माझी दैना' हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

Watch the Video Song Here

4.75 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.75 (2 Votes)
Advertisement