Music Video
Typography

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीसोबत म्युझिक अल्बमही वेगवेगळ्या धाटणीचे बनत चाललेत. अशातच अस्सल मराठमोळ्या ठसक्यात गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात एक म्युझिक अल्बम अलिकडेच रिलीज झाला आहे. 'डीजे वाला दादा' असे नव्या गाण्याचे बोल आहेत.

व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत आणि राज एक्स्लेन्सी क्रिएशन असलेल्या या गाण्यात नवोदित अभिनेत्री दिपाली सुखदेवे हिने भन्नाट डान्स केला आहे. प्रिती नाईक निर्मित आणि पराग भावसार यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे.

Watch the Song Now

सद्यस्थितीत डीजे ऑपरेटरवर आधारित अनेक हिंदी - मराठी गाणी आली असली तरी गीतकार कौतुक शिरोडकर यांनी लिहीलेले गाणे थोडया वेगळ्या धाटणीचे आहे. सुप्रसिध्द गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांनी 'डिजेवाला दादा' हे गाणे संगीतबद्ध केले. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांनी केले आहे.

DJ Wala Dada Music Video 02

DJ Wala Dada Music Video 03

DJ Wala Dada Music Video 04

DJ Wala Dada Music Video 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement