गीतकार, गायक वैभव लोंढे यांच्या आवाजातील 'खंडेराया झाली माझी दैना' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट ची प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती चेतन गरुड प्रॉडक्शनने केली आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये गाण्याच्या भाषेला साजेसा असा एक माहोल निर्माण केला गेला आहे. ट्रेडीशनल गाण्याला रोमँटिक टच देऊन एक नवे व्हर्जन सादर करण्याचा प्रयत्न संगीत दिग्दर्शकाने केला आहे.

चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर कशी तू’ नुकताच लाँच झाला. सेवन सीज मोशन पिक्चर्स आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत समीर परब आणि संतोष परब निर्मित ओमकार माने आणि जयपाल वाधवानी दिग्दर्शित ‘बेखबर कशी तू’ ह्या म्युझिक अल्बमच्या लाँचला सुप्रसिध्द फिल्ममेकर संजय जाधव उपस्थित होते.

मराठीतील ईश्वर भक्तीपर काव्यरचनेला फार मोठी प्रगल्भ अशी परंपरा लाभलेली आहे. सध्या भारतभर सुरु असलेला नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा केला जात आहे. त्यात देवींची गाणी लक्ष वेधून घेत आहेत. नुकतेच या आदिशक्तीवरील एक गीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. शब्द मनांत, ओठांवर सतत रहावेत, अशा शब्दरचनेवर कवी अरुण सांगोळे यांनी भर दिला असून संगीतकार प्रसाद फाटक यांनी संगीतातल्या वेगवेगळ्या प्रचलित रागांच्या माध्यमातून आगळेवेगळे संगीत देण्याचा प्रयत्न केला आहे.

"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ" गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर आहे आणि सागरीकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत याच शब्दात केलं आहे. सागरिका म्युझिकने "वक्रतुंड महाकाय" या खास गाण्याचा व्हिडीओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे. या व्हिडिओच दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे. मराठी संगीत क्षेत्रातील दोन आघाडीच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे या दोघांच्या दमदार आवाजात हे गीत संगीतबद्ध करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेना आणि घाडगे आणि सून मधील रिचा अग्निहोत्री आणि नवोदित कलाकार निरंजन जोशी यांनी आपली उत्तम अदाकारी दाखवली आहे

श्रावण सुरू झाला की एका पाठोपाठ एक सणांची रांग लागते. प्रत्येक सणाची आपली वेगळीच धमाल... वेगळीच मस्ती.... याच अनोख्या धमाल-मस्तीने नटलेला सण म्हणजे दहीहंडी. थरांचा थरार सादर करताना आपल्या माणसाला जपण्याची वृत्ती दरवर्षी या सणादरम्यान पाहायला मिळते. जल्लोषात साजरा होणाऱ्या या सणाचा जोश वाढवणारं संदीप कुलकर्णी यांच्या आगामी चित्रपटाचं धमाल गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

पाऊस म्हटलं की प्रत्येक मराठी संगीतप्रेमीला आठवतो तो मिलिंद इंगळे आणि सौमित्र यांचा पाऊसगाण्यांचा अल्बम 'गारवा'. या सदाबहार अल्बमला या वर्षी २० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मिलिंद आणि सौमित्र रसिकांसाठी घेऊन आले आहेत एक नवीन हळूवार गझल - 'तिला सांगा कुणी'.

Advertisement