ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित 'जजमेंट' या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २० सेकंदाच्या या टिझरमध्ये मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांची झलक दिसते. 'माझ्या जीवाला धोका आहे इथे', रडवेल्या आवाजात ऐकू येणारा हा संवाद आणि मंगेश देसाई यांचे कधीही न पाहिलेले रूप चित्रपटाबद्दलचे कुतूहल अधिकच वाढवत आहेत. शिवाय या चित्रपटामध्ये मंगेश देसाई प्रथमच खलनायकाची भूमिका करत असल्यामुळे त्यांच्या अभिनयाची आजपर्यंत कधीही न पाहिलेली एक वेगळी बाजू रसिकांना पाहायला मिळणार आहे.

सर्वत्र निवडणुकांचे वारे जोरात वाहात आहेत. जुनं बुलंद नेतृत्व थोडं बाजूला राहून नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी धुरंधर राजकारणी या निवडणुकीत कंबर कसताना दिसतायत. निवडणुकीच्या याच पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाच वास्तवादी चित्र घेऊन वायाकॉम१८ स्टुडीओज आपल्या भेटीला घेऊन येत आहे नवा चित्रपट. वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि वायाकॉम१८ स्टुडीओज - उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

'H2O' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. एप्रिल महिन्याच्या १२ तारखेला सिनेमा प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा पाण्यावर भाष्य करणारा असून श्रमदानाचे महत्त्व सांगणारा आहे. सध्याच्या उकाड्याने मुंबईसह इतर शहरांतील, गावांतील लोकांना हैराण करून सोडले आहे. परंतु या उन्हापेक्षाही जास्त रखरखणाऱ्या उन्हात 'H2O' या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.

'मिरांडा हाऊस' या चित्रपटाच्या रहस्यमयी पोस्टर नंतर आता या चित्रपटाचा अतिशय उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलर वरून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही. पल्लवी सुभाष तिचा पहिला संवाद 'नाव मोहनचं आणि नंबर मोहिनीचा' म्हणताना तिच्या डोळ्यातील आणि चेहऱ्यावरील अविर्भाव यातच तिचे अभिनयकौशल्य दिसते. चित्रपटाचा ट्रेलर बघताना जे संवाद कानी पडतात त्यावरून चित्रपट पंचमहाभूतांवर तयार केलेल्या चित्रांवर आधारित असल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक रहस्यांची उकल होतानाही यात दिसणार आहे. 'वेलकम टू माय हाउस' हा संवाद ऐकताच मिलिंद गुणाजी यांचा भारदस्त आवाज प्रेक्षकांना नक्कीच चित्रपटगृहापर्यंत नेईल यात वाद नाही. साईंकितचा पहिलाच चित्रपट असला तरी त्याचा अभिनय देखील दमदार आहे. त्याने पदार्पणासाठी योग्य चित्रपटाची निवड केली आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कारण त्याला आतापर्यंत आपण हलक्या फुलक्या भूमिकेत पहिले आहे. त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका साईंकित या चित्रपटात साकारत आहे.

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’चीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आज प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने हा एक भरपूर मनोरंजनाने भरलेला चित्रपट असेल, याची खूणगाठच बांधली गेली आहे. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि विनोदाची मस्त फोडणी असा हा एकूण मामला असेल, हे ट्रेलर पाहताक्षणी पटते आणि चित्रपटाची प्रतीक्षा आणखीनच वाढते.

कहाणी थेंबाची या नावाची टॅगलाईन घेऊन 'H2O' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याच समस्येवर भाष्य करणारा हा सिनेमा असावा, असे टीझरमधून दिसत आहे. टीझरमध्ये आपल्याला तरुण-तरुणी गावामध्ये श्रमदान करताना दिसत आहेत.

Advertisement