Trailers / Teasers
Typography

पिळदार शरीर आणि प्रभावी अभिनय ही अशोक समर्थ यांची खासियत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा अशा बॉक्सिंग ट्रेनरच्या भूमिकेत ते 'बेधडक' या चित्रपटात दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या १ जूनपासून "बेधडक" हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शन केले आहे. गोविंद टावरे यांनी चित्रपटाचं लेखन, सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून गिरीश टावरे याचं अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत आहे.

Watch the Trailer Here

"बेधडक" हा बॉक्सिंगवरचा अॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. उत्तम फिजिक असलेल्या नव्या अभिनेत्याचं या चित्रपटातून पदार्पण होणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात एक दमदार आणि पुरेपूर मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळेल', असं निर्माते मंदार गोविंद टावरे यांनी सांगितलं.

गिरीश टावरे याचं अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, प्रसाद लिमये, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. प्रवीण शशिकांत जगताप याने कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मंगेश कांगणे, गोविंद टावरे आणि प्रवीण बांदकर यांनी लिहिलेल्या गीतांना प्रवीण बांदकर यांचे संगीत लाभले असून आदर्श शिंदे, सिद्धार्थ महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी, प्रवीण बांदकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

Bedhadak Marathi Film Ashok Samarth

4 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement