Trailers / Teasers
Typography

प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा 'गॅटमॅट' राहून जातो. लव्हस्टोरी सुरु होण्याआधी दोघांपैकी एकाला प्रेमाची कबुली ही द्यावीच लागते. पण ती किंवा तो काय विचार करेल या न्यूनगंडात सर्वच काही राहून जातं. अश्या या अव्यक्त भावनांचे मिलन करून देणारी 'गॅटमॅट' ही संस्था येत्या १६ नोव्हेंबरपासून गरजवंतांच्या सेवेला हजर राहणार आहे. मोठ्या पडद्यावर सादर होत असलेल्या या 'गॅटमॅट' चे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आले. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' या सिनेमाचे हे टीझर तरुणवर्गासाठी पर्वणी ठरत आहे.

निशीथ श्रीवास्तव यांच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या टीझरमधून कॉलेजविश्वातील रंगीत दुनिया आपल्याला पाहायला मिळते. तरुणाईने बहरलेल्या या टीझरमध्ये 'गॅटमॅट' चे संस्थापक रंग्या आणि बगळ्या आपल्याला दिसून येतात. गावावरून आलेली ही सामान्य मुलं कशा पद्धतीनं कॉलेज कट्ट्यावर 'गॅटमॅट' चा फड रंगवतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Watch the Teaser Here

या सिनेमाच्या टीझरमध्ये अक्षय टंकसाळे बरोबर रसिका सुनील आणि निखील वैरागर बरोबर पूर्णिमा डे अशी जोडीदेखील आपल्याला पाहायला मिळते. मैत्री, प्रेम आणि रोमान्स दाखवणारे 'गॅटमॅट' सिनेमाचे हे टीझर तरुणवर्गाला लुभावणारे ठरत आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून, महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांसाठी हा 'गॅटमॅट' मनोरंजनाची खुमासदार मेजवानी घेऊन येत आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement