Trailers / Teasers
Typography

ज्यांच्या कथा वाचूनच वाचकांना आपल्या व्यथांचा विसर पडतो. आपल्या शब्दातील व्यंगातुन बहुरंग साकारून प्रेक्षकांना ज्यांनी खळखळून हसविले, असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण. म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे... या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे.

सागर देशमुख या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून चित्रपटाच्या दोन्ही टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. वायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख मा.श्री. राज ठाकरे, वायाकॉम18 स्टुडीओज चे सीओओ, अजित अंधारे, निखिल साने व्यवसाय प्रमुख, मराठी एंटरटेनमेंट वायाकॉम18, महेश मांजरेकर, सागर देशमुख, इरावती हर्षे, दलिप ताहिल, आणि चित्रपटाची संपूर्ण टीमच्या उपस्थित नुकताच प्रदर्शित झाला.

Watch the Trailer Here

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement