Trailers / Teasers
Typography

बी लाइव्ह प्रस्तूत लकी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जीतेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी ह्यांची विशेष उपस्थिती. मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींसोबतच ह्या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला बहार आली.

ट्रेलरमध्ये लकी करायला जातो एक आणि घडतं भलतचं असा काहीसा प्रकार पाहायला मिळतो.

Watch the Trailer Here

'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दीप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ७ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement