Trailers / Teasers
Typography

कहाणी थेंबाची या नावाची टॅगलाईन घेऊन 'H2O' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याच समस्येवर भाष्य करणारा हा सिनेमा असावा, असे टीझरमधून दिसत आहे. टीझरमध्ये आपल्याला तरुण-तरुणी गावामध्ये श्रमदान करताना दिसत आहेत.

टीझरवरून या चित्रपटात प्रेम, मैत्री, वादविवाद असले तरी तरुणाईकडून होणाऱ्या समाजप्रबोधनाचेही दर्शन घडत आहे. हल्ली तरुण पिढी शहराकडे आकर्षित होत असतानाच हे तरुण आपल्या गावात जाऊन श्रमदान करताना दिसत आहेत. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. जी. एस. फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद पाटील यांचे असून सुनील झवर यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. अशोक एन.डी, सुप्रित निकम, धनंजय धुमाळ, शितल अहिरराव, किरण पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Watch the Teaser Here

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement