Actress Sai Tamhankar needs no introduction. She is one of the very few Marathi Artists to achieve recognition internationally. Sai has been a part of Bollywood movies including Black & White & Ghajani. She bagged a lead role in Hunterrr, a 2015 Indian adult comedy movie written and directed by Harshavardhan Kulkarni which starred Gulshan Devaiah and Radhika Apte.

मुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात. 'एक घर हो सपनों का’ पण स्वप्न प्रत्यक्षात आणणे हे महाकठीण काम... प्रत्येकाच्या मनात लपलेली ही इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरून परतून जाते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाने केलेली धडपड दाखविणारा ‘ट्रकभर स्वप्नं’ हा चित्रपट २४ ऑगस्टला आपल्या भेटीला येणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांचे आहे.

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते. त्यामुळेच तर कित्येकजण मंगलाष्टकामधील 'सावधान' या शब्दाचा सूचित अर्थ लावत लग्नापासून दूर पळतात. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' या सिनेमात अश्याच एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली असून, नुकताच या सिनेमाचा मजेशीर टीझर लाँँच करण्यात आला. श्री राम आगाशे (कल्पनाकांत) यांच्या 'मी बायकोला घाबरतो' या धम्माल काव्यपंक्तीवर, प्रमुख भूमिकेत असलेल्या सुबोध भावेची उडालेली भंबेरी या टीझरमध्ये आपल्याला बघायला मिळते.

चित्रपटाची उत्सुकता वाढवणारे ‘Once मोअर’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि त्याची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात नेमकं काय असणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिल्या प्रोमोवरून रहस्यावर आधारित हा चित्रपट असल्याचे लक्षात आले होते, मात्र चित्रपटातील पात्रांचा खुलासा यातून झाला नव्हता. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या टीझर मधून हा खुलासा होणार असून यातून वेगवेगळी पात्र आपल्या भेटीला आली आहेत.

Advertisement