एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ चा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत दिले आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित बोगदा हा सिनेमादेखील याच धाटणीचा आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आला. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर देखील त्यांचे नाते आपणास दिसून येते. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा टीझर प्रकाशित करण्यात आला. ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे. चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे यांच्या भूमिका आहेत.

कॉलेजविश्वातल्या ‘अनकन्डिशनल’ मैत्रीला सेलिब्रेट करणारा ‘दोस्तीगिरी’ सिनेमा २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येणा-या अंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला साजरा करणा-या ह्या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला आहे.

Advertisement