मराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित बोगदा हा सिनेमादेखील याच धाटणीचा आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आला. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर देखील त्यांचे नाते आपणास दिसून येते. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा टीझर प्रकाशित करण्यात आला. ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे. चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे यांच्या भूमिका आहेत.

कॉलेजविश्वातल्या ‘अनकन्डिशनल’ मैत्रीला सेलिब्रेट करणारा ‘दोस्तीगिरी’ सिनेमा २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येणा-या अंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला साजरा करणा-या ह्या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला आहे.

प्रत्येकांच्या आयुष्यात मित्र हा असतोच! सुख-दुखांमध्ये निस्वार्थपणे सोबत देणारा हा यार आणि त्याच्या दुनियादारीची मज्जा काही औरच असते. हीच मज्जा सचिन दरेकर दिग्दर्शित आगामी 'पार्टी' सिनेमात पाहायला मिळणार आहे. मैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या या सिनेमाचा नुकताच टीझर लाँँच करण्यात आला.

काहीतरी मिळवायचं असलं, की अपरिमित कष्ट करावे लागतात.. या प्रवासात अनेक अडथळे समोर येतात... हे अडथळे जो पार करतो, तोच स्वतःला सिद्ध करतो... रे राया कर धावा या चित्रपटाचा आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.

Advertisement