अभिजित भोसले जेन्युइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. निर्मित बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा खतरनाक असा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांचे लेखन, दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाबद्दल ‘अराररारा खतरनाक’ गाण्यामुळे निर्माण झालेली उत्कंठा या टीझर मुळे अधिकच ताणली गेली आहे. ‘देऊळ बंद’ च्या यशानंतर प्रविण तरडे यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे.

Watch Official Trailer of Marathi Film Gat-Mat. The film stars Akshay Tanksale, Rasika Sunil, Nikhil Wairagar and Purniema Dey. The film is directed by Nishith Shrivastava and preented by Avadhoot Gupte.

प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा 'गॅटमॅट' राहून जातो. लव्हस्टोरी सुरु होण्याआधी दोघांपैकी एकाला प्रेमाची कबुली ही द्यावीच लागते. पण ती किंवा तो काय विचार करेल या न्यूनगंडात सर्वच काही राहून जातं. अश्या या अव्यक्त भावनांचे मिलन करून देणारी 'गॅटमॅट' ही संस्था येत्या १६ नोव्हेंबरपासून गरजवंतांच्या सेवेला हजर राहणार आहे. मोठ्या पडद्यावर सादर होत असलेल्या या 'गॅटमॅट' चे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आले. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' या सिनेमाचे हे टीझर तरुणवर्गासाठी पर्वणी ठरत आहे.

Viacom18 Motion Pictures proudly presents the official trailer of 'Ani...Dr. Kashinath Ghanekar'. This Diwali celebrate and relive the golden era of Marathi theatre with the story of its first superstar, Dr. Kashinath Ghanekar!  Written and Directed by Abhijeet Deshpande, the film stars Subodh Bhave, Sumeet Raghvan, Sonali Kulkarni, Vaidehi Parshurami and Nandita Dhuri in pivotal roles.

अभिनेता केके मेननचं मराठीतलं पदार्पण, अभिनेता लोकेश विजय गुप्तेचं दिग्दर्शकीय पदार्पण म्हणून एक सांगायचंय Unsaid Harmony हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. देवी सातेरी प्रॉडक्शननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि अन्य मान्यवरमंडळी आवर्जून उपस्थित होती. या चित्रपटाविषयी आता खऱ्या अर्थाने उत्सुकता निर्माण झाली आहे.

अगडबम नाजुकाच्या थरारक करामती मांडणाऱ्या 'माझा अगडबम' या आगामी सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर नवीन ट्रेलर लाँच करण्यात आला. सुपरहिट 'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेला हा सिनेमा येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करीत आहे. साधी सरळ आणि सोज्वळ अश्या सामान्य गृहिणीच्या भूमिकेत असलेली नाजुका आणि तिचा प्रेमळ नवरा रायबाची रंजक गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर, खराखुरा सुमो आणि डब्ल्यूडब्ल्यूईचे रेसलरदेखील यात आपल्याला दिसून येत असून, मावळ्यासारखा पेहराव घातलेला एक नकापधारी पेहलवानदेखील यात आपल्याला पाहायला मिळतो. अगडबम नाजुकासारखीच शरीरयष्टी असलेल्या या पेहलवानाची उकल मात्र या ट्रेलरमध्ये होत नसल्याकारणामुळे, प्रेक्षकांसाठी तो कुतूहलाचा विषय ठरत आहे.

Advertisement