‘अग्नी, कर्ज, रोग आणि शत्रू या चार गोष्टी वेळीच नष्ट नाही केल्या तर त्या पुन्हा उद्भवतात.’ स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग रॉकी लवकरच मराठी चित्रपट ‘रॉकी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक ‘अहमद खान’ यांच्या हस्ते नुकताच प्रदर्शित झाला. ‘रॉकी’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एक जबरदस्त अॅक्शनपट मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण झाला आहे.

मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन' आता लवकरच शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' हा भन्नाट चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. यात गणेश पंडित, सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत. यावरून हा सिनेमा मैत्री, प्रेम, लग्न या विषयवार आधारित आहे, याचा अंदाज येतो.

एका गावात सात वर्षात सात आत्महत्या होतात आणि ह्या सगळ्या आत्महत्या श्रावण महिन्यातच होतात. विशेष म्हणजे त्यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे. ह्या प्रत्येकानेच कोणाला तरी पाहिलंय. कोणाला?.. सावट कथेचा चित्तथरारक टिझर लाँच झाला आहे. त्यातून स्पष्ट होतंय की, हा थरारक सिनेमा पाहताना एक प्रकाराची रक्त गोठवणारी भीती नसानसातून सळसळणार आहे.

गेली जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक, मधली सुट्टी सारख्या कार्यक्रमाचा संकल्पनाकार अश्या विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारा सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. चित्रपटाचा टीझर संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारी २८ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं ह, कुणी जेवल्यावाचून नाही जायचं ह’ हे लग्नाचे बोल आपणाला ऐकायला मिळतात.

आत्तापर्यंत विविध खेळांवर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिलेत पण अस्सल मातीतला खेळ 'कबड्डी' तसा दुर्लक्षितच राहिला म्हणायचा. नेमकी हीच बाब हेरत जयंत लाडे निर्माता हयांचा लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि या निर्मिती संस्थेचा 'सूर सपाटा' हा गावठी कबड्डीवरआधारित मराठी चित्रपट २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्राला कबड्डी... कबड्डी... म्हणायला भाग पाडेल यात काही शंका नाही. तत्पूर्वी मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची एक खास झलक आपण पाहू शकणार आहोत. ७० एम एमवर खेळल्या जाणाऱ्या या चित्रपटाची सध्या चर्चा सर्वत्र रंगली असून त्याचा वेगवान, उत्कंठा ताणणारा टिझर प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

‘समीर’...एकुलता एक मुलगा, तो ही मनाने आणि राहणीमानाने एकदम साधा पण त्याचं लव्ह मॅरीज होणार असे गडबडे बाबांनी केलेले भाकीत. एक से बढकर एक, नटखट, प्रेमळ, ग्लॅमरस तरुणी आणि जिगरी दोस्त ‘बाब्या’चे लव्ह टीप्स... या सर्व गोष्टींमुळे एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटात खूप सारे मनोरंजक किस्से आणि धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Advertisement