Viacom18 Motion Pictures proudly presents the official trailer of 'Ani...Dr. Kashinath Ghanekar'. This Diwali celebrate and relive the golden era of Marathi theatre with the story of its first superstar, Dr. Kashinath Ghanekar!  Written and Directed by Abhijeet Deshpande, the film stars Subodh Bhave, Sumeet Raghvan, Sonali Kulkarni, Vaidehi Parshurami and Nandita Dhuri in pivotal roles.

अभिनेता केके मेननचं मराठीतलं पदार्पण, अभिनेता लोकेश विजय गुप्तेचं दिग्दर्शकीय पदार्पण म्हणून एक सांगायचंय Unsaid Harmony हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. देवी सातेरी प्रॉडक्शननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि अन्य मान्यवरमंडळी आवर्जून उपस्थित होती. या चित्रपटाविषयी आता खऱ्या अर्थाने उत्सुकता निर्माण झाली आहे.

अगडबम नाजुकाच्या थरारक करामती मांडणाऱ्या 'माझा अगडबम' या आगामी सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर नवीन ट्रेलर लाँच करण्यात आला. सुपरहिट 'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेला हा सिनेमा येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करीत आहे. साधी सरळ आणि सोज्वळ अश्या सामान्य गृहिणीच्या भूमिकेत असलेली नाजुका आणि तिचा प्रेमळ नवरा रायबाची रंजक गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर, खराखुरा सुमो आणि डब्ल्यूडब्ल्यूईचे रेसलरदेखील यात आपल्याला दिसून येत असून, मावळ्यासारखा पेहराव घातलेला एक नकापधारी पेहलवानदेखील यात आपल्याला पाहायला मिळतो. अगडबम नाजुकासारखीच शरीरयष्टी असलेल्या या पेहलवानाची उकल मात्र या ट्रेलरमध्ये होत नसल्याकारणामुळे, प्रेक्षकांसाठी तो कुतूहलाचा विषय ठरत आहे.

‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या या बहुप्रतीक्षित ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाचा टीझर ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील स्वप्नील जोशी मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीझर प्रेक्षकांना देतो.

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत होते, ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते, ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती, असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येणार आहेत. ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुबोध भावे, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

Advertisement