‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या या बहुप्रतीक्षित ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाचा टीझर ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील स्वप्नील जोशी मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीझर प्रेक्षकांना देतो.

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत होते, ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते, ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती, असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येणार आहेत. ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुबोध भावे, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ ह्या धमाल हळदीच्या गाण्याने संगीतक्षेत्रात डेब्यू झाला आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव ह्या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता ह्यांनी संगीतबध्द केलेले ‘चंद्रमुखी’ हे गाणे गायले आहे.

Advertisement