‘खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे’ अशी धमाकेदार टॅगलाईन असलेल्या ‘मस्का’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आला. अभिनेता प्रियदर्शन जाधवचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण असलेल्या ‘मस्का’ मध्ये सस्पेन्स आणि थ्रीलरचा तडका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

मालवणी भाषेचा तडका आणि रेडियोची धम्माल घेऊन येणाऱ्या 'रेडू' सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच गमतीदार ट्रेलर लाँच करण्यात आला. ६०-७० च्या दशकातला 'रेट्रो' काळ गाजवणाऱ्या रेडियोची रंजक सफर या ट्रेलरमधून घडून येत असल्यामुळे, हा सिनेमा अनेकांसाठी नाॅस्टेलजीक ठरणार आहे. लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने 'रेडू' हा सिनेमा, येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित 'रेडू' या सिनेमात मराठी - मालवणी भाषेचा सर्वाधिक वापर केला गेला असल्याचे पाहायला मिळते. रेडूच्या माध्यमातून सामान्य माणसाचे भावविश्व या सिनेमात मांडण्यात आले आहे.

बालपण म्हटले की दंगा, मस्ती आणि खट्याळपणा हा ओघानेच येतो. यंदाच्या उन्हाळ्यात असाच एक खट्याळ मुलगा आपल्या सर्वांना भेटायला येत आहे. सुट्ट्यांमध्ये त्याची गम्मत बघणे सर्व बच्चेकंपनी साठी मनोरंजक ठरणार आहे. निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ‘मंकी बात’ या बहुचर्चित बाल चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला.

ग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या वंटास या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातलं "टिपूर टिपूर...." हे गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालं असून, ४ मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Advertisement