दोन सुंदर जोडपी, सोबतीला व्हायोलिनची साथ आणि मनात प्रेमाची पालवी फुटेल असे लाघवी संगीत, शिवाय, सोबतीला गावाकडच सुंदरदृश्य, मातीतील अस्सल बोलीभाषा आणि प्रेमाच्या तालात थिरकायला लावणारे बोल म्हटल्यावर ‘जीव पिरमात तुझ्या म्याड रं’ अस म्हणण्याची वेळ येणारंच ना. ऐन उन्हाळ्यात प्रेमाचा फिवर वाढवणारे ‘जीव पिरमात तुझ्या म्याड रं’ हे गाणे मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित 'बाबो' या मराठी चित्रपटातील असून ते सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'शिमगा' या चित्रपटातील नवीन गाणं 'गुणगुणतंय' रिलीज करण्यात आले आहे. भूषण आणि मानसी यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं एक रोमँटिक गाणं आहे. गाण्याची सुरुवात मानसीच्या गृह्प्रवेशाने होते. लग्नानंतर फुलत जाणारं हळुवार प्रेम या गाण्यात अगदी हुबेहूब दाखवण्यात आले आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून 'त्या' दोघांमधलं गोड नातं ते व्यक्त करत आहे.

शीला, मुन्नी, जलेबीबाई अशा आयटम साँग नंतर आता 'रसगुल्लाबाई' प्रेक्षकांसमोर येत आहे. आम्ही बेफिकर या चित्रपटात हे धमाकेदार आयटम साँग पहायला मिळणार असून, प्रियंका झेमसेनं या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. कडाक्याच्या थंडीत या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं.

गावखेड्यातल्या नदीकाठच्या निसर्गसौंदर्य धरतीवर काही मुलांचा खेळ रंगला आहे. 'रंग भारी रे रंगणार' म्हणत रंगलेला हा कबड्डीचा खेळ आणि सोबतच रंगपंचमीच्या रंगांची उधळण पाहताना रसिकही त्यात समरसून जातील यात काही शंका नाही. 'सूर सापटा'ची मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा चांगलीच रंगलेली असताना, आत्ता त्यातील एका गाण्याने या उत्सुकतेमध्ये आणखी भर घातली आहे. 'सूर सपाटा'मधील 'रंग भारी रे... रंगणार' हे गीत मंगेश कांगणे लिहिले असून त्याला संगीत अभिनय जगताप यांचे असून आदर्श शिंदेच्या खड्या आवाजातील या गाण्याला प्रियांका बर्वेच्या सुमधुर आवाजाचीही किनार लाभली आहे. या गाण्यातील होलिकोत्सव पाठोपाठच येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाचे मनमोहक चित्रण मनाला भुरळ पाडणारं झालं आहे ज्याचे नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे यांनी केले आहे.

होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्यासाठी सगळे गावकरी ग्रामदेवतेच्या देवळात जमतात आणि नाचत ढोलताश्यांच्या गजरात, होम करून धुमधडाक्यात शिमगा साजरा करतात. हा सण साजरा करताना गावातील वाडी-वाडीमध्ये पालखी नाचवताना जुगलबंदी देखील होते. अशा या शिमगा सणाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला देण्यासाठी याच संकल्पनेवर आधारित असा 'शिमगा' हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटातील 'चांदणं रातीला आला शिमगा' हे उत्साहवर्धक गाणं प्रदर्शित झाले आहे.

 या चित्रपटाच्या अभूतपूर्ण यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी आपल्या अनोख्या शैलीतून चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल रसिकांचे आभार मानले आहेत. किंग जे. डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मराठी मधील पहिले रॅपर असे बिरुद मिळवलेल्या श्रेयश जाधव यांनी त्यांच्या शैलीत 'मी पण सचिन' चित्रपटाचे रॅप सॉंग बनवले आहे. हे जरी रॅप सॉंग असले तरी ते एक प्रेरणादायी गाणे सुद्धा आहे. स्वप्नांच्या दिशेने प्रवास करताना, त्या प्रवासाला पाठिंबा देताना आवश्यक अशा स्फूर्तीदायी शब्दांनी परिपूर्ण असे हे रॅप सॉंग आहे. लोकांनी कितीही मागे खेचले तरी आपल्या स्वप्नांच्या दिशेने केला जाणारा खडतर प्रवास हा नक्कीच यश मिळवून देतो. असा मतीतार्थ या रॅप सॉंग मधून मिळत आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी जे लोक मेहनत करत आहेत, अशा लोकांना हे गाणं नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Advertisement