Video Songs
Typography

या कोळीवाड्याची शान, वाट बघतोय रिक्षावाला रिमेक या गाण्यांचे संगीतकार, बानुबया बानुबया, लागिरं झालं जी, येरे येरे पैसा, पिपाणी या गाण्यांनी अक्षरश: मराठी रसिक प्रेक्षकांना वेड लावले. यांचे गायक म्हणजे प्रवीण कुंवर. त्यांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आवाज मनाला साद घालतो. प्रविण कुंवर विविध भाषांमध्ये तीस पेक्षा जास्त चित्रपटाचे संगीतकार आहेत. आतापर्यंत अनेक सुपरहीट गाणी देणाऱ्या प्रवीण कुंवर यांचं ‘ताईच्या लग्नाला’ हे नवीन गाणं सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

अवघ्या दोन आठवड्यांमध्ये या गाण्याचे हिट्स लाखांच्या घरात पोहोचले आहे. सध्या सगळीकडेच लग्नसराईचा माहौल आहे. त्यामुळे ‘ताईच्या लग्नाला’ गाणं लग्नसराईत सगळ्यांचं आवडतं गाणं ठरत आहे. या गाण्याचे संगीतकार आणि गायक प्रविण कुंवर आहेत तर त्यांना साथ दिली आहे भारती मढवी यांनी. दिग्दर्शक सचिन आंबात यांनी गाण्याचे बोल रचले आहेत. आपल्या दिलखेच अदांनी, नृत्याने लोकांच्या मनापर्यंत पोहोचणारी मोनिका कांबळी-खाडे या गाण्याद्वारे पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन नितीन जाधव यांनी केले आहे. हे गाणं २१ जूनला एचसीची मोबाईल ऍपद्वारे पहिला प्रदर्शित होणारा चित्रपट ’लव्ह लफडे’ मध्ये पहावयास मिळणार आहे.

Wacth The Song Now

 

3.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 3.50 (1 Vote)